नरवण धरणवाडी, मुख्याध्यापक गुरव यांचा विशेष सन्मान
गुहागर, ता. 24 : तालुक्यातील नरवण धरणवाडी येथील सोमेश्वर मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिकुल परिस्थितीत शिक्षणाचे महत्त्व पटवून देवून वाडीतील अनेकांना घडविणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय तथा डी. पी. गुरव (रा. गुहागर) यांचा विशेष सन्मान मंडळाने केला. Amritmahotsav of Naravan Someshwar Mandal

गुहागर तालुक्यातील नरवण धरणवाडी येथील सोमेश्वर मंडळाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. मंडळाच्यावतीने गेली ७५ वर्ष सातत्याने वाडीच्या सामाजिक, शैक्षणिक विकासाबरोबरच सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम राबविले आहेत. यावर्षी अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने सलग आठ दिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या गेल्या ७५ वर्षांच्या कार्याचा लेखाजोगा मांडणारी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. वार्षिक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून या सोहळ्याची सांगता झाली. याच उपक्रमाचा भाग म्हणून मंडळातर्फे वाडीतील प्राथमिक शाळेत आपल्या नोकरीची सुरुवात करणाऱ्या दत्तात्रय परशुराम तथा डी.पी. गुरव यांचा विशेष गौरव करण्यात आला. Amritmahotsav of Naravan Someshwar Mandal

सत्तरीच्या दशकात प्रतिकूल परिस्थितीत दत्तात्रय गुरव यांनी नरवण धरणवाडी येथे शिक्षकाच्या नोकरीला सुरवात केली. ग्रामीण भागातील शाळा असूनही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ते कायम प्रयत्नशील राहीले. त्याच्या हाताखाली शिकुन मोठे झालेले अनेक विद्यार्थी आजही गुरव गुरुजींचे नाव अभिमानाने सांगतात. त्यांच्या या समाजोपयोगी कार्याचा सन्मान मानपत्र, सन्मानचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मंडळाच्या वतीने करण्यात आला. Amritmahotsav of Naravan Someshwar Mandal
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नरवण कुणबी मंडळाचे अध्यक्ष अनंत मालप, कार्याध्यक्ष बाळ गोताड, धरणवाडी सोमेश्वर मंडळाचे मुंबई अध्यक्ष शंकर कुळये, सचिव सुनील मोरे, स्थानिक अध्यक्ष दत्ताराम गोणबरे, उपाध्यक्ष चंद्रकांत बाचीम, खजिनदार स्थानिक विठ्ठल कुळ्ये, शांताराम कुळ्ये, चंद्रकांत गोणबरे, प्रकाश जोगळे, सुलोचना कुळ्ये, स्वाती कुळ्ये आदींसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजीत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धरणवाडीतील मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सर्वतोपरी मेहनत घेतली. Amritmahotsav of Naravan Someshwar Mandal
