स्वातंत्र्यदिनी लावलेली नक्षिदार फलक आजही अस्तित्वात
गुहागर, ता.16 : ब्रिटिशांच्या राजवटीचा अंत झाला आणि नवीन सूर्योदय झाला. तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 या दिवसाची आठवण करून देणारी वास्तू म्हणजे गुहागर खालचापाट येथील “गोपालकृष्ण भुवन” स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना ही वास्तू आपलं अस्तित्व टिकवून आहे हे नवलच. स्वातंत्र्यदिनाचा लाकडी फलक ही वास्तू मोठ्या अभिमानाने मिरवते आहे. Amritmahotsav of “Gopalkrishna Bhuvan”

गुहागर खालचापाट येथील स्वर्गीय श्री. दानशूर मदनशेठ गोविंद आरेकर हे देशप्रेमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जायचे. गोरगरिबांचे संसार मार्गी लावण्यात त्यांचे मोठे योगदान असे. मदनशेठ यांचा जन्म 1903 रोजी झाला. त्यामुळे ब्रिटिश राजवटीचे जुलूम जवळून पाहिले. देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द असल्याने भूमिगत चळवळीला त्यांचे मोठे योगदानहि दिले. गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. मदनशेठ यांची भगवंत श्रीकृष्णावर निस्सीम भक्ती असल्यामुळे घराला गोपाल कृष्ण भवन व गुहागर हायस्कूला गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर असे नाव देण्यात आले. घराचे काम 1940 ला सुरू झाले. आणि पुढे सहा वर्ष सुरू राहिले. आरेकर कुटुंबिय 15 ऑगस्ट 1947 ला या वास्तूत रहायला गेले. या वास्तूचे स्व. रामचंद्र घाडे यांनी काम केले असून घरावरील लाकडी फळक नक्षीकाम हे वाखाण्याजोगे आहे. पर्यटकांनी या घराचे लाकडी नक्षीकाम आकर्षित करते. Amritmahotsav of “Gopalkrishna Bhuvan“

अनेक संकटाचा सामना करत श्री. दत्तात्रेय मदन आरेकर, स्व. सुदर्मा मदन आरेकर व विलास मदन आरेकर यांनी हा स्वातंत्र्याचा वारसा अविरत जपला. आणि आज त्यांची पुढची पिढी अवधूत आरेकर व अनिरुद्ध आरेकर हेही तितक्याच सचोटीने जपत आहेत. Amritmahotsav of “Gopalkrishna Bhuvan“

