• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 May 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

एसटीचा अमृतमहोत्सवी वर्धापन दिन

by Manoj Bavdhankar
June 2, 2024
in Guhagar
163 2
0
Amritmahotsav Anniversary of ST
321
SHARES
917
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 02 : लाल परी अर्थातच ए.टी च्या 76 व्या वाढदिवसानिमित्त गुहागर आगारांमध्ये केक कापून आणि लाल परीचे पूजन करून वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला. यावेळी गुहागर आगार व्यवस्थापिका सौ सोनाली कांबळे मॅडम, अधिकारी कर्मचारी, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी व इतर प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Amritmahotsav Anniversary of ST

ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, महाराष्ट्राच्या विकासात सिंहाचा वाटा असलेली लाडक्या लालपरीचा (एसटी) काल १ जून रोजी ७६ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. ७७ व्या वर्षात पदापर्ण करणाऱ्या एसटीने आता आधुनिकतेच्या वाटेवर प्रवास सुरु केला आहे.  राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या एसटीचे महत्व मात्र कोणी नाकारु शकत नाही. शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत एसटी धावते. ग्रामीण भागातील नागरिकांचे तर एसटी हे प्रमुख वाहतुकीचे साधनआहे. सध्या १५ हजार बसेस, ५६० पेक्षा जास्त बस स्थानकांवरून दररोज  लाखो प्रवाशांची वाहतूक केली जाते. १ जुन १९४८ रोजी पुणे- अहमदनगर मार्गावर पहिली एसटी धावली. या घटनेला एक जूनला ७६ वर्षे पूर्ण होत आहेत.  एसटीचा हा अमृतमहोत्सवी वर्धापन दिन आहे. Amritmahotsav Anniversary of ST

Tags: Amritmahotsav Anniversary of STAnniversaryGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSTUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share128SendTweet80
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.