• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 May 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुंढर नं.1 शाळेचा अमृत महोत्सव सोहळा

by Mayuresh Patnakar
April 20, 2023
in Guhagar
114 1
0
Amrit Mahotsav Celebration of Mundhar School
224
SHARES
641
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सोहळ्यानिमित्त दि. 30 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील मुंढर येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मुंढर नं.1 या शाळेचा अमृत महोत्सव सोहळा घेण्यात येणार आहे. हा सोहळा रविवार दि. 30 एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. Amrit Mahotsav Celebration of Mundhar School

या अमृतमहोत्सव सोहळ्यानिमित्त सकाळी ८ ते 10 या वेळेत ज्ञानज्योत मिरवणूक व शोभायात्रा, सकाळी 10 ते 11अल्पोपहार, सकाळी 11ते 1 या वेळेत दीपप्रज्वलन प्रतिमा पूजन, त्यानंतर प्रमुख अतिथींचा सत्कार व इतर जाहीर सत्कार तसेच मान्यवर व माजी विद्यार्थ्यांचे मनोगत, दुपारी १ ते 3 या वेळेत स्नेह भोजन, दुपारी ३ ते 5 या वेळेत माजी विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा व महिला भगिनींसाठी हळदीकुंकू समारंभ, रात्री 8 ते 11 या वेळेत प्राथमिक शाळा मुंढर न. 1 चे आजी माजी विदयार्थी, अंगणवाडी विद्यार्थी यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Amrit Mahotsav Celebration of Mundhar School

या सत्कार समारंभामध्ये माजी शिक्षक, विद्यमान शिक्षक, सन्माननीय देणगीदार, 75 वर्षे पुढील माजी विद्यार्थी, शाळेचे मान्यवर माजी विद्यार्थी, शिष्यवृत्ती धारक माजी विद्यार्थी इत्यादी सत्कार करण्यात येणार आहेत. Amrit Mahotsav Celebration of Mundhar School

या अमृत महोत्सव कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेजे माजी विद्यार्थी व विद्यमान माध्यमिक शिक्षणाधिकारी कोल्हापूर श्री. एकनाथ आंबोकर, गुहागर तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, गटशिक्षणाधिकारी लीना भागवत, विस्तार अधिकारी रायचंद्र गळवे, केंद्रीय प्रमुख अशोक गावणकर, तालुक्यातील मान्यवर शिक्षक, मुंढर कातकिरी सरपंच प्रणिता रामाणे, ग्राम पंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. Amrit Mahotsav Celebration of Mundhar School

तरी या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन अमृत महोत्सव कमिटी अध्यक्ष प्रभाकर शिर्के, उपाध्यक्ष डॉ. प्रकाश शिर्के, सचिव प्रकाश अनंत शिर्के, खजिनदार विनायक लांजेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश आग्रे, सर्व शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, सर्व पालक वर्ग आणि शाळेचे माजी विद्यार्थी यांनी केले आहे. Amrit Mahotsav Celebration of Mundhar School

Tags: Amrit Mahotsav Celebration of Mundhar SchoolGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share90SendTweet56
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.