गुहागर, ता. 30 : गुहागर नगरपंचायतीच्यावतीने गुहागर शहरातून सवाद्य मिरवणुकीने अमृत कलश यात्रा काढण्यात आली. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत माझी माती, माझा देश या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमिवर हा उपक्रम राबविण्यात आला होता. ही अमृत कलश मिरवणुक नगरपंचायत समितीच्या इमारतीपासून सुरू करून ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी मंदिरापर्यंत काढण्यात आली. बेंजोच्या वाद्यावर ही यात्रा काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी ग्रामस्थांनी मुठभर माती या कलशामध्ये जमा केली. यामध्ये बहुसंख्य ग्रामस्थांनी सहभाग नोंदवीला. Amrit Kalash Yatra taken out in Guhagar
या अमृत कलश यात्रेमध्ये नगरपंचायतीचे कर्मचारी जनार्दन साटले, आशिष खांबे, प्रतिम वराडकर, सुनिल नवजेकर आदी कर्मचारी, माजी नगरसेविका, शामकांत खातू, संतोष वरंडे, स्नेहा वरंडे, स्नेहा भागडे, संजय मालप, नगरसेवक उमेश भोसले, मयुरेश कचरेकर, गजानन वेल्हाळ यांसह बहुसंख्य ग्रामस्थ सहभागी झाले होते. Amrit Kalash Yatra taken out in Guhagar