• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर भाजप तालुकाध्यक्ष पदी निलेश सुर्वे

by Ganesh Dhanawade
September 30, 2023
in Guhagar
174 2
5
Guhagar BJP Taluka President Nilesh Surve
342
SHARES
977
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 : गुहागर तालुका भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी पुन्हा एकदा डॅशिंग नेतृत्व करणारे तवसाळ येथील श्री. निलेश सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटन वाढीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत पक्षाने त्यांना पुन्हा एकदा तालुकाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. तालुकाध्यक्ष पदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.  Guhagar BJP Taluka President Nilesh Surve

भारतीय जनता पार्टीच्या पक्ष घटनेनुसार दर तीन वर्षांनी राष्ट्रीय स्तरापासून ते मंडल स्तरापर्यंत पदाधिकारी नियुक्ती केली जाते. याच पार्श्वभूमीवर दि. २७ रोजी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडळ अध्यक्ष म्हणजेच तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच काही जिल्हा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आल्या. यामध्ये गुहागर तालुकाध्यक्षपदी निलेश सुर्वे यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.  Guhagar BJP Taluka President Nilesh Surve

सर्वसामान्य कुटुंबातील असलेले श्री. सुर्वे हे सर्वसामान्य कार्यकर्ता ते भाजप तालुकाध्यक्ष पद असा प्रवास केला आहे. सुरुवातीला पर्यटन व्यवसाय आणि पत्रकारिता केली. त्यानंतर राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. गुहागर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी वरिष्ठांनी तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी निलेश सुर्वे यांच्यावर सोपवली होती. तालुकाध्यक्ष पदाच्या कालावधीत पक्ष संघटनेबरोबरच विरोधकांनाही जसेच्या तसे उत्तर देण्याचे काम केले आहे. तालुक्यातील विविध विषयांवर आवाज उठवून नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. एक डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.  Guhagar BJP Taluka President Nilesh Surve

Tags: BJPGuhagarGuhagar BJP Taluka President Nilesh SurveGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्याभाजपभाजप तालुकाध्यक्षमराठी बातम्यालोकल न्युज
Share137SendTweet86
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.