मुंबई, ता. 25 : रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहचवण्यासाठी रुग्णवाहिका फार महत्वाच्या असतात. रुग्णावर तातडीने उपचार व्हावेत यासाठी रुग्णवाहिका वेळेवर पोहचावी लागते. या रुग्णवाहिका चालवणाऱ्या वाहन चालकांमुळेच रुग्ण वेळेवर रुग्णालयात पोहचवला जातो. मात्र आता राज्यातील १०८ रुग्णवाहिका चालकांनी १ सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. Ambulance drivers on indefinite strike


महाराष्ट्र रुग्णवाहिका क्रमांक १०८ वाहनचालक संघटनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र, या विषयावर अद्याप देखील तोडगा न निघाल्याने महाराष्ट्रातील १०८ रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या चालकांनी बेमुदत संप पुकारला असल्याची माहिती संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पस्टे यांनी दिली आहे. Ambulance drivers on indefinite strike


बीव्हिजी कंपनीकडून या चालकांची नेमणूक करण्यात आली आहे. वेतनवाढीची समस्या अनेकदा सांगून देखील सुटत नसल्याने अखेर रुग्णवाहिका चालकांनी १ सप्टेंबरपासून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. वेतन वाढीचा तोडगा काढण्यासाठी अमरावतीत जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांनी निवेदन सादर केले. मागणी मान्य न झाल्यास काम बंद करून उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी रुग्णवाहिका चालकांनी दिला आहे. रूग्णवाहिका चालक संपावर गेल्यास रुग्णांची मोठी गैरसोय होऊ शकते. वेळेत रुग्णाला एका ठिकाणाहून दुसरीकडे न नेल्यास रुग्णाचा जीव जाण्याची भीती देखील व्यक्त होत आहे. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांची मागणी पूर्ण होणार का? त्यांना पगारवाढ मिळणार का? शासन यावर कोणता सुवर्णमध्य काढणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. Ambulance drivers on indefinite strike