जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान
गुहागर, ता. 02 : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर NH १६६ E चिपळूण ते गुहागर येथे अपघात ग्रस्तांच्या सेवेत रुग्णवाहिका दाखल झाली आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी उत्साहात करण्यात आले. ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे. ही रुग्णवाहिका या परिसरातील लोकांचे प्राण वाचवणारी देवदूत बनणार आहे. चिपळूण ते गुहागर यामध्ये तीन घाट येतात. या भागात अपघाताचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे ती मध्यवर्ती ठिकाणी देवघर येथील भारत पेट्रोल पंप प्रियंका ऑटोमोबाइल या ठिकांणी 24 तास सेवेत असेल. Ambulance dedication ceremony
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गुहागरचे गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत तसेच गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. निखील जाधव, देवघरच्या सरपंच विजया विजय जाधव, गुहागर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप जाधव, देवघर वैद्यकीय दवाखान्याचे डॉ. वसंत सकपाळ, पेट्रोल पंपाचे मालक राजेंद्र घोसाळकर व शिक्षक प्रदीप चव्हाण सर आदी उपस्थित होते. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कांबळी, अँबुलन्स सेवा सेक्रेटरी श्री राजन बोडेकर व श्री स्वप्निल सकपाळ सहभागी झाले होते. Ambulance dedication ceremony
या कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी जिल्हा सेवा समितीतर्फे करण्यात आले होते. त्यांच्यातर्फे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पी. डी. जाधव, जिल्हा निरीक्षक संदीप नार्वेकर, जिल्हा महिला अध्यक्ष सौ. सुलोचना कोठावळे, जिल्हा अँम्बुलन्स प्रमुख प्रतिक चौगुले, जिल्हा सामाजिक प्रमुख प्रसाद शिवणेकर, गुहागार तालुका अध्यक्ष सौ. धनश्री मांजरेकर, विशेष कार्यवाहक दीपक तावडे गुरुजी आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. Ambulance dedication ceremony