• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

डॉ. ओक हॉस्पिटलमध्ये वर्धापन दिनी रुग्णवाहिका दाखल

by Ganesh Dhanawade
January 15, 2024
in Guhagar
124 1
0
Ambulance brought in on anniversary by Oak Hospital
243
SHARES
695
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वर्षभरात हजारो रुग्णांना सेवा

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील शृंगारतळी येथील डॉ. सचिन ओक यांचे गुहागर तालुक्यातील सुसज्ज “प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल” मध्ये वर्षभरात हजारो रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे. पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हॉस्पिटलच्या वतीने रुग्णवाहिकाहि रुग्णसेवेत दाखल करण्यात आली आहे. डॉ. सचिन ओक व डॉ. अश्विनी ओक हे दापंत्य शृंगारतळी येथे प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना वैद्यकीय सेवा देत आहेत. Ambulance brought in on anniversary by Oak Hospital

Ambulance brought in on anniversary by Oak Hospital

डॉ. सचिन ओक हे तालुक्यातील एकमेव एम. बी. बी. एस. सर्जन असून त्यांच्या पत्नी डॉ. अश्विनी ओक या तालुक्यातील एकमेव डोळ्यांच्या स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत. तालुक्यातील रुग्णांना मोठ्या आजारावरील उपचार व शस्त्रक्रिया करण्यासासाठी चिपळूण, मुंबई, पुणे या ठिकाणी जावे लागत होते. परंतु आता डॉ. ओक यांनी त्यांच्या हॉस्पिटल मध्ये ओपीडी सोबतच आय. पी. डी. सेवा चालू केल्याने तिथे रुग्णांना इमर्जन्सी सेवा पण २४ तास मिळत आहे. डॉ. सचिन ओक यांनी गेल्या वर्षभरात अपेंडिक्स, हर्निया, चरबीच्या गाठी काढणे यासारख्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत. तर डॉ. अश्विनी ओक यांनी मोतीबिंदू व डोळ्यांच्या आजारावरील शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आली असून त्यातील मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया या सवलतीच्या दरात करण्यात आल्या आहेत. Ambulance brought in on anniversary by Oak Hospital

त्याशिवाय स्त्रिरोग, अस्थिरोग, शुगर, डायबेटीस, हार्टच्या आजारावरील अनेक नामवंत डॉक्टर या हॉस्पिटल मध्ये येऊन रुग्णांना सेवा देत आहेत. या सेवा देत असतानाच डॉ. ओक हे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांना निसर्गाचा समतोल राखावा या भावनेतून वृक्ष वाटप करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाबाबत रुग्ण, नातेवाईक व जनतेकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. कोणाला जर मोफत नेत्र शिबिराचे आयोजन करायचे असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन देखील हॉस्पिटलच्या वतीने केले आहे. Ambulance brought in on anniversary by Oak Hospital

डॉ. ओक यांच्या हॉस्पिटलला ११ जानेवारी २०२३ ला सुरुवात करण्यात आली. डॉ. सचिन ओक MBBS MS. तर त्यांच्या पत्नी डॉ. अश्विनी ओक MBBS. DOMS (डोळ्यांच्या स्पेशालिस्ट) आहेत. त्यांनी वर्षभरात ३०० पेक्षा जास्त डोळ्यांची ऑपरेशन केली आहेत तसेच डॉ . सचिन ओक हे तालुक्यातील एकमेव सर्जन असुन त्यांनी १०० पेक्षा जास्त विविध प्रकारची ऑपरेशन व २०० पेक्षा जास्त लहान प्रकारची ऑपरेशन केली आहेत. त्यांच्या हॉस्पीटल मध्ये हार्ट, डायबेटीस स्पेशालिस्ट डॉ. गोपाळ चिगले (MBBS. MD) डॉ. राकेश हसबे (स्त्रीरोगतज्ञ) डॉ. ओंकार शर्मा ( हाडांचे स्पेशालिस्ट), डॉ. अक्षय पाटील (कान, नाक, घसा तज्ञ), डॉ. मधुरा कुलकर्णी (मिरज येथील हाडांचे स्पेशालिस्ट जी .एस.कुलकर्णी यांच्या स्नुषा) आणि भुलतज्ञ डॉ. अविनाश पवार हे डॉक्टर उपलब्ध असतात.साप्ताहिक भेटीसाठी हे डॉक्टर उपलब्ध असतात. यापुढेही अजुन स्पेशालिस्ट डॉक्टर पुढील काही कालावधीमध्ये या हॉस्पीटल मध्ये उपलब्ध करण्याचा विचार असल्याचे डॉ. सचिन ओक यांनी सांगितले. Ambulance brought in on anniversary by Oak Hospital

Tags: Ambulance brought in on anniversary by Oak HospitalGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share97SendTweet61
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.