संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 22 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आंबेरे खुर्द या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गणपत पाते यांची सर्वांनूमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. Ambere Khurd Tanta Mukti President Pandurang Pate

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाते हे गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेचे संचालक, कुणबी समाजाचे संघ मुंबई शाखा तालुका ग्रामीण या सामाजिक संस्थेचे ते अध्यक्ष, ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे ते गुहागर तालुकाध्यक्ष, भाग्योदय ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था पाचेरी आगर – आंबेरे खुर्द या संस्थेचे ते सरचिटणीस असून जेष्ठ, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाते यांची आंबेरे गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गुहागर तालुक्यातील विविध सामाजिक धार्मिक आणि राजकीय स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव करण्यात येत आहे. Ambere Khurd Tanta Mukti President Pandurang Pate