श्री विठ्ठलाई देवीच्या वार्षिक महोत्सव शताब्दी वर्षानिमित्त आयोजित
गुहागर, ता. 01 : तालुक्यामधील अडूर गावातील श्री विठ्ठलाई देवीच्या वार्षिक महोत्सव शताब्दी वर्षाच्या निमित्ताने ग्रामविकास मंडळ अडूरतर्फे नुकतीच कोकण प्रांत मर्यादित भव्य ऑनलाईन निबंध स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत माध्यमिक शिक्षक श्री. सुरेश महादेव आंबेकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. Ambekar 2nd in Konkan Province Online Essay Contest

या ऑनलाईन निबंध स्पर्धेसाठी ९०० ते १००० शब्दमर्यादा होती. निबंध स्पर्धेसाठी ‘माझ्या स्वप्नातील उद्योग ‘, ‘कोकण प्रांतासमोरील प्रश्न व उपाय ‘ , स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षासमोरील ध्येय ‘ , ‘ संघटनेचे महत्त्व ‘ व ‘युवाशक्ती…… राष्ट्रशक्ती ‘ असे पाच विषय देण्यात आले होते. तालुक्यातील उमराठखुर्द आंबेकरवाडीचे सुपुत्र श्री. सुरेश आंबेकर यांनी ” स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षासमोरील ध्येय ” या विषयावर सुमारे १३०० शब्दांचा निबंध सादर केला होता. निबंध स्पर्धेचा निकाल आज दि. १ मार्च रोजी जाहीर केला. यात श्री. आंबेकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. यावेळी त्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. Ambekar 2nd in Konkan Province Online Essay Contest