संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन परिचय स्पर्धा घेण्यात आली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाने बाबासाहेबांच्या जीवनाचा, कार्याचा व देशाला लाभलेल्या योगदानाचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा या उद्देशाने घेण्यात आली. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती पुस्तिकेवर आधारित परीक्षा घेण्यात आली. Ambedkar Life Introduction Competition at Aabloli College


या परीक्षेमध्ये यशस्वी प्रत्येक वर्गातील प्रथम क्रमांकास बक्षीस देण्यात आली. हि बक्षिसे लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे सन्मा.कोषाध्यक्ष श्री. रमाकांत (नाना) विष्णू साळवी यांच्यामार्फत देण्यात आली. यामध्ये इयत्ता पाचवीतील समर्थ शैलेश दिंडे व अद्वैत सुरेश ठोंबरे. इयत्ता सहावी निधी संतोष पागडे व अक्षरा संदेश सावंत. इयत्ता आठवीतील हिंदवी दत्तात्रय राठोड. इयत्ता नववीतील प्रथमेश प्रशांत जाधव व रुद्र राकेश साळवी हे विद्यार्थी बक्षीसपात्र ठरले. Ambedkar Life Introduction Competition at Aabloli College
सदर परीक्षा यशस्वी होण्यासाठी श्री. दिनेश नेटके, श्री. नितिन जगताप, श्री. वैभव ढवळ व प्राचार्य श्री. डि. डी. गिरी यांचे मौलिक योगदान लाभले. लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष श्री.सचिनशेठ बाईत व सर्व कार्यकारिणीने या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. Ambedkar Life Introduction Competition at Aabloli College