• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

by Ganesh Dhanawade
May 22, 2023
in Guhagar
254 3
0
Alumni Reunion of Guhagar High School

श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर मधील माजी विद्यार्थी आणि शिक्षक.

499
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

गुहागर, ता. 22 : येथील श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरच्या सन १९८६-८७ दहावीच्या बॅचचे पहिले स्नेहसंमेलन दि. ७ मे रोजी गुहागर बाजारपेठेतील खातू मसाले उद्योजक श्री. शाळिग्राम खातू यांच्या घराच्या वरील हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. या स्नेहसंमलनासाठी विविध ठिकाणाहून २२ माजी विद्यार्थी उपस्थित होते. Alumni Reunion of Guhagar High School

Alumni Reunion of Guhagar High School

सन १९८६-८७ दहावीच्या बॅचचे पहिलेच स्नेहसंमेलन असल्याने सगळ्यांनी शाळेच्या आठवणींमध्ये, गमती जमती मध्ये दिवस घालवला. पहिलंच गेट टु गेदर असल्यामुळे सर्वांचे औक्षण करून स्वागत केले. खोबऱ्याची अंबावडी आणि कोहळा वडीने सगळ्यांचे तोंड गोड केले. त्यानंतर प्रत्येकाने आपली ओळख – परिचय करून दिला. यावेळी पहिल्यांदाच भेटलेल्या मित्र मैत्रिणी यांनी शाळेच्या आठवणी, किस्से, गमती जमती, नकला, शिक्षकांच्या आठवणी ताज्या केल्या. सगळेजण 35 – 36 वर्षे मागे गेले. अन्नपूर्णा हॉटेलचे मालक श्री. श्यामकांत खातू यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहसंमेलन सौ. सिध्दी सोहनी, सौ. स्नेहा वरंडे, बापू लोखंडे, हेमचंद्र मोरे, वासुदेव खरे आदींचा समावेश होता. या सगळ्यांनीच आपले गेट टु गेदर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. Alumni Reunion of Guhagar High School

संध्याकाळी शाळेला व शिक्षकांना भेट दिली . यावेळी आठवण म्हणून दोन सीलिंग फॅन भेट दिले. यावेळी शाळेत सौ. पाटणकर मॅडम, श्री. अशोक आठवले, श्री. अशोक दिक्षित, श्री खवरे सर आणि विद्यमान मुख्याध्यापक श्री. सुधाकर कांबळे उपस्थित होते. यावेळी श्री. प्रल्हाद सोमण आणि सौ. वृषली आठल्ये यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्या शाळेने आणि शिक्षकांनी आम्हाला घडवले त्यांच्या बद्दल बोलताना विनया भावूक झाल्या होत्या. त्यानंतर समुद्रावर सेल्फी पॉईंट जवळ फोटो काढले. वाळूवर चालून मनसोक्त आनंद लुटला. Alumni Reunion of Guhagar High School

Tags: Alumni Reunion of Guhagar High SchoolGet to GatherGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share200SendTweet125
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.