शाळेतील 14 खोल्या व भव्य रंगमंदिरचे रंगकाम करणेस अमूल्य योगदान
गुहागर, ता. 16 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर येथील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देतानाच शाळेप्रती आपले ऋणानुबंध जपून एक आगळावेगळा ठसा उमटविला आहे. Alumni maintain a bond
गुहागर तालुक्यातील सर्वात जुने १९१९ मध्ये स्थापन झालेले हायस्कूल आज माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आठवणीने उजळून गेले. शंभर वर्षाच्या इतिहासात अनेक विद्यार्थी ह्या विद्यालयात घडले अशाच ह्या माजी विद्यार्थ्यांनी आपण शाळेमुळे चांगले नागरिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो. ह्या शाळेप्रती आमची बांधिलकी आणि आस्था काल, आज आणि भविष्यात राहील असे नमूद करत शाळेतील तब्बल चौदा खोल्या आणि गुहागरची नाट्यपरंपरा जपणारे भव्य रंगमंदिर यांचे रंगकाम करणेस अमूल्य असे योगदान दिले आहे. Alumni maintain a bond


शाळेप्रती आपल्या भावना व्यक्त करताना १९६९ च्या दहावी वर्गाचे श्री. परचुरे, श्री. पाटील श्री. डेरे, श्री. रहाटे, श्री. गावडे, श्री. धुमक १९७५ च्या दहावी वर्गाचे श्री. राजेंद्र आरेकर, १९८९ च्या दहावी वर्गाचे श्री. संदेश पाटणे, २००२ च्या दहावी वर्गाचे श्री. अद्वैत गोखले, २००० च्या दहावी वर्गाचे अभिजीत कदम, श्री. अमित मालप, मंगेश घोरपडे, २००४ च्या दहावी वर्गाचे सौ. स्वामिनी भोसले, २००६ च्या दहावी वर्गाचे श्री. सर्वेश भावे, श्री. राजेश धनावडे, तसेच शिवाज्ञा फाऊंडेशनचे कु. नेहा घाडे, श्री. प्रविण साळवी, श्री.केदार परचुरे, श्री.अद्वैत जोशी आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. जून्या आठवणींना उजाळा देत त्यांनी शाळेस यापुढे आम्ही भरीव मदत करू असे अश्वासन दिले. Alumni maintain a bond


कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक शिवाजी आडेकर यांनी प्रास्ताविक करून सर्व माजी विद्यार्थ्यांचे पुष्प देत स्वागत केले. उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी आपले मनोगत मांडताना माजी विद्यार्थ्यांनी जपलेल्या ह्या ऋणानुबंधाचे कौतुक केले. तसेच गुहागर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी सांगत गुहागर नगरीतील नागरिकांच्या दातृत्वाचे कौतुक केले. सूत्रसंचालन कृपाल परचुरे तर आभार मधुकर गंगावणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. Alumni maintain a bond