• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे पंचांग कार्यशाळा

by Guhagar News
July 27, 2022
in Old News
17 0
0
Almanac workshop at Ratnagiri
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रोजच्या व्यवहारात पंचांग बघणे आवश्यक ; पं. गौरव देशपांडे

रत्नागिरी, ता. 27 :  ठरावीक कर्म त्या योग्य वेळेला झालं तर त्याच फळं आपल्याला मिळतं. यासाठी आपण पंचांग रोज पाहणे. आणि त्यानुसार दिनचर्या करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पुण्यातील पंचांगकर्ते पं. गौरव देशपांडे (सिद्धांत जोतिषरत्न गणकप्रवर) यांनी केले. ते अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ आयोजित पंचांग कार्यशाळा कार्यक्रमात बोलत होते. Almanac workshop at Ratnagiri

अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ आयोजित पंचांग कार्यशाळा ल. वि. केळकर वसतीगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात झाली. या कार्यशाळेला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पंचांगाची पाच अंगे शक व त्याची माहिती पं. देशपांडे व वेंगुर्ल्याचे वेदमूर्ती भूषण जोशी यांनी दिली. चित्पावन मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यशाळेसंबंधी थोडक्यात माहिती दिली. वसतिगृहाचे रविकांत शहाणे यांनी त्यांचे स्वागत केले. Almanac workshop at Ratnagiri

Almanac workshop at Ratnagiri

कार्यशाळेत वेदमूर्ती भूषण जोशी म्हणाले की, अनेकांचा असा समज आहे की, पंचांग केवळ ब्राह्मण अशा एका विशिष्ट समाजाचा भाग आहे. पण तसं नसून पंचांग समग्र समाजासाठी उपयुक्त आहे. त्यातही सर्वात प्राचीन पंचांग जे आहे ते सूर्यसिद्धांत. मात्र महाराष्ट्रात ही पद्धत नसून इथे तऱ्हेतऱ्हेचे पंचांग वापरले जाते. यामुळे आपला उत्सव सण एखादे व्रत यात एकसूत्रीपणा वेळेच्या बाबतीत राहत नाही. Almanac workshop at Ratnagiri

Almanac workshop at Ratnagiri

कार्यशाळेत रत्नागिरी व सिंधदुर्ग अशा दोन्ही जिल्ह्यातून पंचांगप्रेमी अभ्यासक आले होते. पंचांगाची तिथी, वार, योग, नक्षत्र, करण यांची सखोल माहिती, विविध व्रते, दान कोणत्या तिथीवर करावे, कोणत्या वाराला काय करावे, काय करू नये, अडचण उद्भवल्यास शास्त्र काय सांगते, अशी विविध विषयांवर विस्तृत माहिती दिली. पुरोहीत, ज्योतिषी व सर्वसामान्य व्यक्ती यांच्यासाठी नित्याच्या जीवनात उपयुक्त असणारी पंचांग, धर्मशास्त्र व ज्योतिषविषयक माहिती कार्यशाळेत देण्यात आली. नक्षत्र म्हणजे काय, कोणती नक्षत्रे कोणत्या कामांसाठी वापरावीत, अवकहड चक्र, घात चक्र यांचा उपयोग, जन्मनक्षत्रावर कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या करू नयेत याची माहिती दिली. गुणमेलनाविषयी थोडक्यात माहिती आणि कोणता मुहूर्त कोणास कसा लाभतो ते काढण्याची माहिती दिली. या कार्यशाळेत शेवटी उपस्थित लोकांनी त्यांच्या शंका गुरुजींना विचारल्या. Almanac workshop at Ratnagiri

Tags: Almanac workshop at RatnagiriGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.