गुहागर, ता. 18 : गुहागरात अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी विज्ञान नाट्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धा पंचायत समिती गुहागर व तालुका विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. All India Science Drama Competitions

या नाट्य स्पर्धेमध्ये गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय चे विद्यार्थी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. विद्यार्थ्यांनी सर्वमान्य भरडधान्य या विषयावरती आपले नाटिका सादर केली. चारुता आठवले, सानिका महाजन, आदर्शा घाडगे, सिद्धांत बारगोडे, पार्थ सोमण, पारस सावंत, आकाश पवार , सोहम हेगिष्टे ह्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा. दीपक कनगुटकर साहेब यांनी केले. All India Science Drama Competitions

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी लीना भागवत मॅडम यांनी केले. या नाटकाचे परीक्षण जोशी व श्री साळवी, नाटकाचे लेखन संतोष मोहिते, दिग्दर्शन व आभार प्रदर्शन कृपाल परचुरे , नेपथ्य व संगीत राधा शिंदे, वेशभूषा मिताली पाकळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालनबाणे मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी केले. कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक गायत्री कनगुटकर व गीतांजली करंजकर उपस्थित होत्या. गुहागर हायस्कूलच्या नाट्याची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. All India Science Drama Competitions
