• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची सभा संपन्न

by Ganesh Dhanawade
October 18, 2022
in Guhagar
17 0
0
All India Customer Panchayat Meeting
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीची जिल्हास्तरीय ऑनलाईन सभा उत्साहात पार पडली. ही सभा जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. All India Customer Panchayat Meeting

 सभेच्या सुरुवातीला संघटन मंत्री श्री. आनंद ओक यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविकातून जिल्हाध्यक्ष श्री. मांडवकर यानी आजची जिल्हा स्थिती व यापुढे कार्य करताना ग्राहक संघटनेचे काम चांगले झाले पाहिजे हे विषद केले. तसेच इतिवृत्त वाचन व जमाखर्चा बाबत सविस्तर सांगितले. याला सर्वानुमते मंजुरी देणेत आली. या माहितीसह जिल्हा सहकार्य व महत्व विषद केले. तसेच तालुक्यातील ग्राहक संघटनेची चळवळ प्रत्येकाच्या घरघरात पोहचली पाहिजे, यासाठी सर्वसामान्य जनतेच्या समस्या निवारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी शेवटी केले. All India Customer Panchayat Meeting

प्रत्येक तालुकावार झालेला आढावा त्या त्या तालुक्यानी सादर केला. चिपळूणचे सचिव श्री. प्रकाश सावर्डेकर यांनी सदस्यता नोंदणी, महिला जागरण अंतर्गत महिला उद्योजिका सन्मान, संगमेश्वरमधून कोकणप्रांत कोषध्यक्ष वेदाताई प्रभुदेसाई यांनी पोष्ट कार्यालया अंतर्गत ग्राहकांसाठी तालुकास्तर मार्गदर्शन शिबीर, पासबुके उपडेट करणे, दैनंदिनी मागणी, तर गुहागर अध्यक्ष श्री. गणेश धनावडे यांनी सदस्यता नोंदणी, बॅंक अकाउंट अपडेट करणे सारख्या उल्लेखनीय कामाचे सादरीकरण केले. All India Customer Panchayat Meeting

यावेळी कोकण प्रांत अध्यक्ष श्री. चंद्रकांत झगडे यांनी अन्य माहिती व आढाव्यासोबत ग्राहकाचे काम, प्रतिमा वाढवणे, संघटन वाढविण्यावर भर दिला पाहिजे. भविष्यात गाव तिथे ग्राहक पंचायतीची शाखा असा उपक्रम राबवण्यात आवाहन केले. राष्ट्रीय कार्यकारिणी सहसचिव सौ. नेहाताई जोशी यांनी कामांचा आढावा घेवून यापुढील कामे व नियोजनासंबंधी माहिती व सूचना केल्या. श्री. केशवराव भट यांनी उद्योग क्षेत्रात ग्राहक संघटनेच्या कार्याबाबत मत मांडले. राष्ट्रीय कोषाध्यक्ष सौ. वेदाताई फडके यांनी अंक नोंदणीसह आर्थिक बाबींचा उहापोह केला. शेवटी गुहागर तालुकाध्यक्ष श्री. गणेश धनावडे यांनी सर्वांचे आभार मानले. All India Customer Panchayat Meeting

Tags: All India Customer Panchayat MeetingGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.