गुहागर, ता.18 : शहरातील खालचापाट येथील गोयथळे – मोरे मंडळीच्या वतीने नुकतेच अलंकार विखारे यांनी बीएसएल एल एल बी परीक्षेत यश संपादन केले. त्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. Alankar Vikhare is felicitated


अलंकार विखारे हा गुहागर खालचापाट येथील स्थानिक रहिवासी आहे. त्याने खडतर परिस्थितीशी सामना करून वकिली परीक्षेत यश संपादन केले आहे. याची पूर्ण कल्पना खालचापाट येथील गोयथळे-मोरे मंडळींना होती. म्हणून गोयथळे मोरे मंडळीच्या वतीने अलंकार विखारे याचा खोताच्या ओठीवर शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मंडळातील ज्येष्ठ नागरिकांकडून सत्कार करण्यात आला. Alankar Vikhare is felicitated


यावेळी नगरसेवक अमोल गोयथळे, संतोष गोयथळे, सुनील गोयथळे, प्रदीप गोयथळे, समीर मोरे, योगेश गोयथळे, गणेश गोयथळे, विद्याधर गोयथळे, सतीश पाटील, राकेश गोयथळे, मंदार गोयथळे, सौरभ गोयथळे, तनय गोयथळे, जितेंद्र गोयथळे, अथर्व गोयथळे, राहुल गोयथळे, रोहित गोयथळे, स्पर्श गोयथळे, प्रशांत गोयथळे, पार्थ गोयथळे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समील मोरे तर आभार अथर्व गोयथळे यांनी मानले. Alankar Vikhare is felicitated