गुहागर, ता. 07 : तालुक्यातील जानवळे गावचा सुपुत्र अक्षय अनंत म्हादळेकर याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याने त्याच्या सध्या संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे. नुकताच शृंगारतळी येथे या गावातील व पंचक्रोशीतील युवकांनी त्याचे स्वागत करत वाजत गाजत मिरवणूक काढत आनंद साजरा केला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने सत्कार करण्यात आला. Akshay selected in Maharashtra Police Force
यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी जानवळे गावचे शाखा अध्यक्ष शुशांत कोळंबेकर, विवेक जानवळकर व इतर मान्यवर उपस्थित होते. Akshay selected in Maharashtra Police Force