प्राथमिक गटात कुशल पवार व माध्यमिक गटात श्रद्धा धुमक प्रथम
गुहागर, ता. 01 : मराठी भाषा दिनानिमित्त कोकण कट्टातर्फे अक्षरत्न २०२४ ही हस्ताक्षर स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे येथे नुकतीच संपन्न झाली. सदर स्पर्धा इयत्ता पाचवी व सहावीसाठी प्राथमिक अ गट व इयत्ता सातवी ते नववीकरिता माध्यमिक ब गट या दोन गटांमध्ये संपन्न होऊन प्राथमिक गटात १८ व माध्यमिक गटात ३२ असे एकूण ५० विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. Aksharatna Handwriting Competition

अक्षरत्न २०२४ हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून प्राथमिक गटात प्रथम – कुशल वैभवकुमार पवार, द्वितीय – श्रेया अनिल धुमक व तृतीय मधुरा प्रमोद शेलार तसेच माध्यमिक गटात प्रथम – श्रद्धा अनिल धुमक, द्वितीय – समृद्धी सुरेश आंबेकर व तृतीय मानसी संदीप पालकर या विद्यार्थ्यांनी पटकावून सुयश संपादन केले. कोकण कट्टातर्फे अक्षरत्न २०२४ हस्ताक्षर स्पर्धेतील गुणवंत व सहभागी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ मुख्याध्यापक श्री. व्ही. डी. पाटील, ज्येष्ठ शिक्षिका व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. एस.एस. चव्हाण व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. Aksharatna Handwriting Competition
प्राथमिक व माध्यमिक गटामधील सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व शैक्षणिक वस्तू प्रदान करून अभिनंदन करण्यात आले. सदर गुणगौरव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. एस.वाय. भिडे यांनी केले. मुख्याध्यापक व्ही.डी. पाटील यांनी कोकण कट्टाने विद्यालयातील विद्यार्थ्यांना हस्तक्षर स्पर्धेत सहभागी होण्याची व सुयश संपादन करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद मानून सदर स्पर्धेतील सुयशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. Aksharatna Handwriting Competition
