• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाराष्ट्र रा. प्रा. शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी अजय गराटे

by Ganesh Dhanawade
April 16, 2025
in Ratnagiri
79 1
0
Ajay Garate, President of the Teachers' Union
155
SHARES
443
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्हा सरचिटणीस पदी संतोष रावणंग यांची निवड

गुहागर, ता. 16 : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशन रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक शिक्षक पतपेढी  सभागृह चिपळूण येथे नुकताच संपन्न झाला. या अधिवेशनात शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अजय गराटे तर जिल्हा सरचिटणीस पदी संतोष रावणंग यांची निवड करण्यात आली. Ajay Garate, President of the Teachers’ Union

या त्रैवार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष राज्य नेते संभाजीराव थोरात तर विशेष अतिथी म्हणून उधोग मंत्री उदय सामंत,  गृह, महसूल ग्रामविकास आणि पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे, राज्य सरचिटणीस कैलास दहातोंडे, राज्य संपर्क प्रमुख विकास नलावडे, जिल्हाध्यक्ष व राज्य कार्याध्यक्ष संतोष कदम आदी  उपस्थित होते. Ajay Garate, President of the Teachers’ Union

पालकमंत्री उदय सामंत यांनी राज्यस्तरीय प्रश्नांसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सचिवांसोबत मीटिंग घेऊन बदली प्रश्न संच मान्यता इ प्रश्नांवर एकत्रित मीटिंग घेण्याचे आश्वासन दिले. तर योगेश कदम यांनी शिक्षक यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. आमदार भास्करराव जाधव यांनी जर शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही तर त्याची दाद विधानसभेत आवाज उठवेन असा शब्द दिला. Ajay Garate, President of the Teachers’ Union

जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हा नेते कैलास शार्दुल, जिल्हाध्यक्ष अजय गराटे, जिल्हा सरचिटणीस संतोष रावणंग, कार्यकारी अध्यक्ष दिलीप तारवे, कार्याध्यक्ष अंगद अबुज, कार्याध्यक्ष मंगेश कडवईकर, कोषाध्यक्ष सत्यजित पाटील, महिला जिल्हा प्रमुख सौ समिधा कोलते, महिला सचिव सौ माधवी वारे, कार्याध्यक्ष सौ मृण्मयी मोरे यांची निवड करण्यात आली. Ajay Garate, President of the Teachers’ Union

या अधिवेशनला वार्षिक अधिवेशनाला जिल्हा नेते महेंद्र सावंत, जिल्हा सचिव संदीप जालगावकर, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास शार्दुल, संचालक गुहागर श्री.चंद्रकांत झगडे, संचालक मंडणगड श्री. मनेश शिंदे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.मनोजकुमार खानविलकर, मंडणगड तालुकाध्यक्ष निलेश देवक, दापोली तालुकाध्यक्ष श्री.संदीप जालगावकर, खेड तालुकाध्यक्ष श्री.संजय तांदळे, गुहागर तालुकाध्यक्ष श्री.रविंद्र कुळे, चिपळूण तालुकाध्यक्ष श्री.राजेश सोहनी, संगमेश्वर तालुकाध्यक्ष श्री.रामचंद्र निकम, लांजा तालुकाध्यक्ष श्री.मंगेश मोरे, राजापूर तालुकाध्यक्ष श्री. संदीप परटवलकर, संचालक सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते. Ajay Garate, President of the Teachers’ Union

Tags: Ajay GarateGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPresident of the Teachers' UnionUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share62SendTweet39
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.