दिल्ली, 26 : युनायटेड किंग्डममधील वॅडिन्ग्टन येथील रॉयल एयर फोर्सच्या हवाई तळावर होणाऱ्या कोब्रा वॉरियर या युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या 145 हवाई योद्ध्यांची तुकडी हवाई दलाच्या जामनगरच्या तळावरून रवाना झाली. 6 मार्च 2023 ते 24 मार्च 2023 दरम्यान हा युद्धसराव होणार आहे. Air force to participate in Cobra Warrior exercis

कोब्रा वॉरियर हा बहुस्तरीय हवाई युद्धसराव असून यामध्ये फिनलंड, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि सिंगापूर हवाई दलाच्या तुकड्या देखील रॉयल एयर फोर्स आणि भारतीय हवाई दलासोबत सहभागी होणार आहेत. Air force to participate in Cobra Warrior exercis
भारतीय हवाई दल यावेळी या युद्धसरावात पाच मिराज-2000 ही लढाऊ विमाने, दोन सी-17 ग्लोबमास्टर III आणि IL-78 हे हवेत इंधन भरणारे एक विमान यांच्यासह सहभागी होणार आहे. हवाई युद्धामधील विविध प्रकारच्या परिस्थितीमध्ये सहभागी होणे आणि विविध हवाई दलांच्या सर्वोत्तम पद्धती शिकणे हा या युद्धसरावाचा उद्देश आहे. Air force to participate in Cobra Warrior exercis

