संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९८ वी जयंती सरपंच वैष्णवी नेटके यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच वैष्णवी नेटके, उपसरपंच अक्षय पागडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली. Ahilyabai Holkar Jayanti celebrated at Aabaloli

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ग्रामसेवक बी. बी.सूर्यवंशी यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जीवन कार्याचा परिचय व शासनाच्या महिला सन्मान योजनेची माहिती दिली. त्यानंतर महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गावातील अंगणवाडी सेविका सुनिता महादेव पवार आणि आशा सेविका मंजिरी ऋषिकेश भोसले यांना अहिल्याबाई होळकर महिला सन्मान सरपंच वैष्णवी नेटके यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. Ahilyabai Holkar Jayanti celebrated at Aabaloli

महिला सन्मान मिळाल्याबद्दल सुनिता पवार व मंजिरी भोसले यांनी कृतज्ञता व्यक्त केली. माजी सरपंच प्रमोद गोणबरे, माजी उपसरपंच आशिष भोसले, प्रा.अमोल पवार, नितेश पांचाळ यांनी महिला सन्मान विजेत्यांचे कौतुक केले. सरपंच वैष्णवी नेटके यांनी शासनाच्या उपक्रमाचे स्वागत करतानाच गावातील महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचे कौतुक केले. Ahilyabai Holkar Jayanti celebrated at Aabaloli

यावेळी व्यासपीठावर सरपंच वैष्णवी नेटके, उपसरपंच अक्षय पागडे, ग्रामपंचायत सदस्य वृषाली वैद्य, ऋषिकेश बाईत, शैला पालशेतकर, ग्रामसेवक बी.बी.सूर्यवंशी, माजी सरपंच प्रमोद गोणबरे, माजी उपसरपंच आशिष भोसले, प्रा.अमोल पवार, नितेश पांचाळ, तलाठी व्ही.व्ही.जोशी, तलाठी शुभम जाधव, मंगेश पागडे, प्रकाश बोडेकर, कर्मचारी योगेश भोसले, मिथीली भाटकर आदी उपस्थित होते. ग्रामसेवक बी बी सूर्यवंशी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. Ahilyabai Holkar Jayanti celebrated at Aabaloli
