गुहागर, ता. 06 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दि. १ जुलै २०२२ रोजी कृषि दिनानिमित्त, पालपेणे गावातील जि. प. शाळा क्र. २ मध्ये कृषी दिन साजरा करण्यात आला. प्रथम सरस्वतीचे दिप प्रज्वलन करुन मान्यवरांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे प्रतीक बांगर यांनी शेतीविषयक शेतकऱ्यांना व विद्यार्थांना मार्गदर्शन केले. पालपेणे गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यानंतर भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. Agriculture day in Palpene village
डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते, दहीवली, चिपळूण यांच्या कडून ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थी साईराज कात्रे, अभिजित पाटील, विनायक पाटील, सुमित पाटील, प्रज्वल कांबळे, अमोल सुवारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सूनितकुमार पाटील सर, प्राध्यापक श्री. पांडुरंग पाटील सर व श्री. पाकळे सर यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या उत्साहाने कृषी दिन साजरा केला. Agriculture day in Palpene village
या कृषि दिनासाठी सरपंच योगिता पालकर, उपसरपंच रघुनाथ घाणेकर, कृषी सहाय्यक प्रतीक बांगर, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाष्टे, नंदिणी खोचाडे, कीर्ती टाणकर, संतोष मांडवकर, सुवर्णा महाडिक, तंटामुक्ती अध्यक्ष संजय पालकर, शाळेतील शिक्षक विकास पाटील व शेतकरी वर्ग तसेच शाळेतील विद्यार्थी यांच्यासमवेत साजरा करण्यात आला. Agriculture day in Palpene village