• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 September 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ३४६७ शेतकऱ्यांची निवड

by Mayuresh Patnakar
September 1, 2026
in Maharashtra
20 0
0
Agricultural Mechanization Scheme
40
SHARES
113
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 01 : कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांची कृषी उत्पादनक्षमता वाढविणे, श्रम बचत करणे व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या “कृषी यांत्रिकीकरण योजने”तंर्गत सन २०२६-२७ वर्षासाठी जिल्ह्यातील ३ हजार ४६७ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. “प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या पद्धतीनुसार ही निवड करण्यात आली असून, निवड झालेल्या शेतकऱ्यांनी निवड झाल्यापासून १० दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. Agricultural Mechanization Scheme

जिल्ह्यात प्रामुख्याने पॉवर टिलर, पॉवर विडर, ग्रास कटर, चेन सॉ, पॉवर स्प्रेअर आणि भात मळणी यंत्र यांसारख्या आधुनिक कृषी यंत्रांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. या योजनेसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी आपण अर्ज केलेल्या यंत्र किंवा अवजाराची आवश्यक कागदपत्रे (उदा. दरपत्रक, टेस्ट रिपोर्ट, जात प्रमाणपत्र इ.) महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ‘अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी’ द्वारे लॉग इन करून अपलोड करणे बंधनकारक आहे. Agricultural Mechanization Scheme

तालुकानिहाय निवड झालेले लाभार्थी पुढीलप्रमाणे आहेत. मंडणगड 315, दापोली 367, खेड 307, चिपळूण 331, गुहागर 368, संगमेश्वर 388, रत्नागिरी 492, लांजा 424, राजापूर 375

विहित मुदतीत कागदपत्रे अपलोड न केल्यास महाडीबीटी पोर्टलद्वारे संबंधित शेतकऱ्याचा अर्ज रद्द होवू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही विलंब न करता सीएससी केंद्राद्वारे किंवा वैयक्तिकरित्या कागदपत्र अपलोड करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभातर्फे करण्यात आले आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी गाव पातळीवरील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. Agricultural Mechanization Scheme

Tags: Agricultural Mechanization SchemeGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.