• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीतर्फे कृषि मेळावा

by Guhagar News
December 22, 2022
in Guhagar
118 1
0
Agricultural gathering at Sringaratali
231
SHARES
660
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शृंगारतळी ग्रामपंचायत हॉल येथे दि. 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता

गुहागर, ता. 22 : राष्ट्रीय किसान दिवसाचे औचित्य साधून गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीतर्फे (Guhagar Organic Producers Company) पहिला वार्षिक कृषि मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा दि. 23 डिसेंबर 2022 रोजी शृंगारतळी ग्रामपंचायत हॉल येथे स. 10 वा. घेण्यात आला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी सदर मेळाव्याला उपस्थित रहावे. तसेच यावेळी कंपनीच्या भागधारकांना शेअर्स सर्टिफिकेट वितरणही करण्यात येणार आहे. Agricultural gathering at Sringaratali

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

Buy seeds and give product at guaranteed price कंपनीकडून बियाणे अर्ध्या किंमतीत विकत घ्यायचे आणि त्यातुन मिळणारे उत्पादन हमी भावात याच कंपनीला विकायचे. अशी अनोखी योजना गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीने (Guhagar Organic Producers Company) आणली आहे. या कार्यक्रमासाठी कृषिविद्यावेत्ता प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी कृषी सहाय्यक, श्री भूषण परब, सेंद्रिय शेती संशोधन विभाग दापोलीचे जिल्हा प्रबंधक नाबार्ड मंगेश कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी, कुऱ्हाडे मॅडम, प्रकल्प संचालक आत्मा, रत्नागिरी, चिखले मॅडम, तालुका कृषी अधिकारी, गुहागर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. Agricultural gathering at Sringaratali

या कृषि मेळाव्याला सकाळी 10 वा स्वागत समारंभ घेण्यात येईल. त्यानंतर स. 11 वा. दापोली कृषि विद्यापीठ तर्फे कोकणातील फळपीक लागवड व नियोजन यावर श्री. केदार मालशे हे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी दु. 1 वा. स्नेह भोजन, त्यानंतर दु. 2 वा. शेअर सर्टिफिकेट वितरण सोहळा मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे. तरी आपण सर्व शेतकऱ्यांनी सदर मेळाव्याला आवर्जून उपस्थित रहावे. व कृषि मेळाव्याचा लाभ घ्यावा. अशी नम्र विनंती गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीतर्फे करण्यात आली आहे. Agricultural gathering at Sringaratali

गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिंक करा.

Tags: Agricultural gathering at SringarataliGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share92SendTweet58
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.