गुहागर, ता. 21 : खरवते-दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या कृषीदूत विद्यार्थ्यांनी सायले (ता- संगमेश्वर) येथे नुकतेच ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत’ शेती अवजारे, अत्याधुनिक यंत्रे व माहितीपत्रके यांचे कृषी प्रदर्शन पार पडले. Agricultural Exhibition conducted by Agricultural Envoys
या कार्यक्रमांसाठी ग्रामपंचायत सायले व आदर्श केंद्र शाळा सायले यांचे विशेष सहकार्य लाभले. शेतकऱ्यांना आधुनिक पीक व शेती तंत्रज्ञान यांची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांना विविध आधुनिक शेतीचे ज्ञान प्राप्त होऊन व त्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी कृषी प्रदर्शन भरविण्यात आले होते. Agricultural Exhibition conducted by Agricultural Envoys
यावेळी हर्षवर्धन चौगुले, प्रफुल्ल वायकर, जगदीश कराड, देव कडू, अद्वैत कुरबेट, सुयश गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील, विभाग प्रमुख प्रा. हरिशचंद्र भागडे, प्रकल्प समन्वयक प्रा. पी.बी.पाटील, प्रा. निशिकांत पाकळे, प्रा. अंबरिश हट्टाली यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रुपेश कदम, सरपंच सौ. शिला कदम, मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता यशवंत, विजय पांचाळ, वैशाली भालेकर आदीसह शिक्षक, विद्यार्थी, महिला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. Agricultural Exhibition conducted by Agricultural Envoys