आगार व्यवस्थापक कांबळे व वाहतुक नियंत्रक पवार यांना सुनावले खडे बोल
गुहागर, ता. 17 : गुहागर एसटी आगाराकडुन नवीन शैक्षणिक वर्ष सुरुवात होऊन पुर्वीप्रमाणे नियमीत एसटी फेऱ्या सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे तालुक्यातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचे होणारी गैरसोय लक्षात घेता, भारतीय जनता पार्टीकडुन (BJP) आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले होते. तरीही या सर्व परिस्थितीचे कोणतेही गांभीर्य नसलेल्या गुहागर आगाराकडुन याविषयी कोणतीच सुधारणा होत नव्हती. यामुळे तालुक्यातील प्रवासी, विद्यार्थ्यांची गैरसोय आणि शैक्षणिक नुकसान होत असल्याने गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीने आक्रमक पवित्र घेतला आहे. याबाबत आगारप्रमुखांना भाजपच्या अधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी धारेवर धरले. Aggressive posture of BJP
दोन वर्षाच्या कोरोना महामारी संसर्गाच्या कालखंडानंतर आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या ऐतिहासिक संपानंतर नवीन शैक्षणिक वर्षात गुहागर तालुक्यात विद्यार्थ्यांना नियमितपणे सेवा पुरवण्यात गुहागर आगाराकडुन कसुर केला जात होता. या संदर्भात तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, ग्रामपंचायती, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक, शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी वारंवार संपर्क, लेखी निवेदन देऊनही गुहागर आगाराच्या कामकाजात कोणतीही सुधारणा होत नव्हती. चालु केलेल्या फेऱ्या दुसऱ्या दिवशी बंद करणे, फेऱ्यांच्या वेळेत बदल करत असताना कोणतीही पुर्व सूचना न देणे, तालुका अंतर्गत व्यवस्थेचा विचार न करता लांब पल्ल्याच्या फेऱ्या चालू करणे. असे अनेक प्रकार आगार व्यवस्थापकांकडून केले जात होते. कारणे मात्र सांगितली जात होती की, टायरची उपलब्धता नाही. महामंडळाच्या फायद्याचा विचार न करता फक्त गाड्यांच्या कीलोमिटर वाढीकडे आगाराच्या अधिका-यांचे लक्ष होते. Aggressive posture of BJP
गुहागर आगाराला होणाऱ्या अपुऱ्या टायरच्या पुरवठ्या करता गुहागर भाजपा तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी रत्नागीरी विभाग नियंत्रक श्री. बोरसे यांच्याकडे संपर्क करून गुहागर आगाराला तातडीने टायरचा पुरवठा करण्याची मागणी गेले चार दिवस करत होते. आणि त्या मागणीला यशही आले. दि. 14 जुलै 2022 रोजी 36 टायरची तात्काळ व्यवस्था विभाग नियंत्रकानी केली. याबद्दल भाजपाने त्यांचे आभारही व्यक्त केले. टायर आले, मात्र टायर आवश्यक प्रक्रीयाकरुन ते गाड्याना जोडण्याकामी विजेचा खेळखंडोबा अडथळा ठरत आहे. त्यामुळे आवश्यक फे-या सोडण्यास विलंब होत असल्याचे आगार व्यवस्थापकानी कारण पुढे केले. या संदर्भातही भाजप तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे आणि सरचिटणीस सचिन ओक यांनी तात्काळ कार्यकारी अभियंता महाराष्ट्र वीज वितरण श्री. गलांडे यांच्याकडे संपर्क करून ही वीजव्यवस्था सुरळीत करण्यास सांगितले. Aggressive posture of BJP
या आक्रमक पवित्रानंतर आगार प्रमुख वैभव कांबळे आणि वाहतुक नियंत्रक पवार यांनी भाजपाच्या आणि तालुक्यातून झालेल्या अनेकांच्या मागणीनुसार आम्ही येत्या आठ दिवसात गुहागरवासीयाना आणि विद्यार्थ्यांना आवश्यक असणा-या एसटी फे-या नियमित आणि शाश्वतपणे चालु करु. आणि सुरु असणा-या काही लांब पल्ल्याच्या तोट्यात असणाऱ्या एसटी फेऱ्या बंद करू. तसेच जनतेच्या मागणीनुसार आवश्यक त्या नवीन फेऱ्यांचा सुद्धा गांभीर्याने विचार करु. तालुक्यातील एकुण वाहतुक व्यवस्था लक्षात घेण्याकरता एसटीचे चालक आणि वाहक यांच्याकडुनही माहिती घेणार असल्याचे सांगीतले. त्याचप्रमाणे दोन वर्षाच्या कोरोना कालखंडापूर्वी ज्याप्रमाणे गुहागर आगाराची वाहतूक व्यवस्था चालु होती. त्याप्रमाणे ती नव्याने शाश्वतपणे चालु ठेवण्याचा प्रामाणीकपणे प्रयत्न करणार असल्याचे आगार व्यवस्थापक कांबळे यांनी सांगीतले. Aggressive posture of BJP
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, उमराट गावचे ग्रामस्थ प्रकाश पवार, कृष्णा गोरीवले, आरे सरपंच श्रीकांत महाजन, युवा मोर्चा गुहागर शहराध्यक्ष मंदार पालशेतकर, उपाध्यक्ष हेमंत बारटक्के आदीसह बहुसंख्य भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. Aggressive posture of BJP
गुहागर तालुक्यातील विद्यार्थी बस फेऱ्या सुरू ठेवा (ही बातमी वाचण्यासाठी क्लिक करा )