आगार व्यवस्थापक वनकुद्रे यांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांना आश्र्वासन
गुहागर, ता. 01 : येथील एस.टी. महामंडळाच्या आगारात वाहनतळ आणि पेट्रोलपंप सुरु करण्यासाठी जागा देण्याची आम्ही अनुकुल आहोत. असे आश्र्वासन आगार व्यवस्थापक वनकुद्रे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. या विषयात तातडीने लक्ष घालण्याची विनंती शिवसेनेचे पदाधिकारी पालकमंत्री उदय सामंत यांना करणार आहेत. Agar managers’ assurance to Shiv Sena office bearers

गुहागर शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. मे महिना, दिवाळी, नाताळ या सुट्टीच्या कालावधीत पोलीस परेड मैदान वाहनांनी भरुन जाते. मग येणाऱ्या पर्यटकांना मुख्य रस्त्यावर वाहने उभी करावी लागतात. त्यामुळे सर्वांनाच वाहतुक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. Agar managers’ assurance to Shiv Sena office bearers
शहरातील वाढलेली वाहनांची संख्या व जोडीला पर्यटन हंगामात येणारी वाहने यामुळे गुहागर शहरात पेट्रोलपंप, सीएनजी पंप तसेच ई चार्जिंग स्टेशनची आवश्यकता भासु लागली आहे. महाविकास आघाडी सत्तेत असताना आमदार भास्कर जाधव यांच्यासह गुहागर तालुका पत्रकार संघ, शहरातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्याकडे पेट्रोलपंपाची मागणी केली होती. तालुकास्थानावरील आगारातील डिझेल पंप सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचे धोरण महामंडळातर्फे आखण्याचा विचार परब यांनी बोलुन दाखविला होता. मात्र त्यानंतर हे धोरणच बारगळले.

दरम्यान आज शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत गुहागरचे आगार व्यवस्थापक वनकुद्रे यांनी भेट घेतली. वाहनतळ व पेट्रोलपंपाविषयी चर्चा केली. त्यावेळी बसस्थानकाजवळील काही जागा पे ॲण्ड पार्कच्या धर्तीवर वाहनतळासाठी दिली तर आगाराचे उत्पन्न वाढेल. पेट्रोलपंपासाठी देखील स्वतंत्र जागा उपलब्ध करु देवू शकतो. आम्ही त्यासाठी सकारात्मक आहोत. मात्र याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावर होणे आवश्यक आहे. असे मत वनकुद्रे यांनी व्यक्त केले. आगार व्यवस्थापक सकारात्मक असल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यासंदर्भात आम्ही थेट पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी बोलणार असल्याचे दिपक कनगुटकर यांनी सांगितले. Agar managers’ assurance to Shiv Sena office bearers
आगार व्यवस्थापकांची भेट घेतेवेळी शिवसेना तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांच्यासोबत शहर प्रमुख निलेश मोरे, संतोष गुहागरकर, राजेश कदम व एसटी कर्मचारी पावसकर आदी उपस्थित होते. Agar managers’ assurance to Shiv Sena office bearers
