अनुसूचित जमातीमध्ये तेढ निर्माण करणा-यांवर कायदेशीर कारवाई करा
गुहागर, ता.15 : अनुसूचित जमातीमध्ये तेढ निर्माण करणा-या व्यक्ती व संस्थेवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (Organization for Rights of Human) शाखा रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. Afroh’s statement to the Collector
जिल्हाधिकारी यांच्या वतीने नायब तहसिलदार संजय खेडस्कर यांनी ऑफ्रोहचे (Afroh) निवेदन स्वीकारले. गेले तीन वर्ष आधिसंख्य व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित होते. शेवटी गेल्या मंत्रीमंडळ बैठकीत अधिसंख्य व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देण्याबाबत शिंदे – फडणवीस सरकारने सकारात्मक निर्णय घेतला. मात्र कायम पोटशूळ असलेल्या १२ आदिवासी जमातीच्या नेत्यांनी, व संघटनांनी शासनाचा निषेध करणे सुरू केले. व आमच्या विशिष्ट जमातीला ‘बोगस’ व ‘जातचोर’ म्हणून अनुसूचित जमातीच्या मध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे अशा व्यक्ती व संस्थेवर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणीही निवेदनातून करण्यात आली. Afroh’s statement to the Collector
विस्तारित क्षेत्रातील ३३ जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावर निवडून आलेल्या १४ बोगस आदिवासी आमदार व २ बोगस आदिवासी खासदार यांना हटवा. निवृत्त न्यायाधीश गायकवाड समितीच्या अहवालानुसार आदिवासी विकास विभागात ६ हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाका. Afroh’s statement to the Collector
आदिवासी कल्याण समितीचे अध्यक्ष आ. सूरेश धस यांचा आदिवासी विकास विभागात दाबून ठेवलेला अहवाल तात्काळ उघड करा. आदिवासी विकास विभागात केलेल्या ६००० कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाका. अनुसूचित जमातीच्या जातप्रमाणपत्र तपासणी समितीने ‘प्रधान’ यांना ‘परधान’, ‘आंध’ यांना ‘अंध’, ‘बुरूड’ यांना ‘गोंड’ जमातीचे दिलेले बोगस वैधता प्रमाणपत्र रद्द करा व या तपासणी समिती व अधिका-यांची असून चौकशी करा, खुल्या प्रवर्गाच्या असूनही अनुसूचित जमातीच्या जागेवर लागलेल्या सौ. स्वप्नल जोपळे यांना बडतर्फ करा, अशी मागणीही निवेदनातून केली आहे. Afroh’s statement to the Collector
यावेळी ऑफ्रोहचे जिल्हाध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख गजेंद्र पौनीकर यांच्यासह महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सुनंदा फुकट, सहसचिव स्वाती रोडे, सुरेखा घावट, बळीराम भगत आदी कर्मचारी उपस्थित होते. Afroh’s statement to the Collector