• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ऑफ्रोह व महिला आघाडीची मासिक सभा संपन्न

by Ganesh Dhanawade
September 5, 2023
in Guhagar
82 1
0
Afroh and Women's Aghadi monthly meeting

सचिन कारेकर यांचा सपत्नीक सत्कार करताना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. उषा पारशे

162
SHARES
462
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

‘ऑफ्रोह’ने कर्मचा-यांसह समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करावे – सचिन कारेकर

गुहागर, ता. 05 : ऑफ्रोहने कर्मचा-यांच्या प्रश्नासोबतच अन्यायग्रस्त समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कार्य करावे, असे मत स्पेशल कोकण-4 (एसके-4) हळदीचे संशोधक प्रगतशील शेतकरी व गारवा कृषी पर्यटन केंद्राचे संचालक सचिन कारेकर यांनी व्यक्त केले. व तसा ठराव ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) शाखा रत्नागिरीच्या मासिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते घेण्यात आला. Afroh and Women’s Aghadi monthly meeting

आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्रात ऑफ्रोह रत्नागिरी व महिला आघाडीची मासिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सचिन कारेकर हे सत्काराला उत्तर देताना बोलत होते. यावेळी आफ्रोहचे प्रसिद्धीप्रमुख तथा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर, आफ्रोह महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. उषा पारशे, ऑफ्रोहच्या उपाध्यक्षा नंदा राणे, सचिव बापुराव रोडे, कोकण विभागीय सहसचिव गजानन उमरेडकर, महिला आघाडी सचिव सुनंदा देशमुख, सहसचिव स्वाती रोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. Afroh and Women’s Aghadi monthly meeting

प्रारंभी सभेचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर व सौ. उषा पारशे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी एसके – 4 हळदीचे प्रणेते राष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनच्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार व विविध पुरस्कार प्राप्त, व गारवा कृषी पर्यटन केंद्राचे संचालक सचिन कारेकर यांचा शाल, श्रीफळ व सौ. स्वरूपा यांचा साडी व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. विशेष करून स्वेच्छानिवृत्त कर्मचारी विष्णू घावट, सेवानिवृत्त हरिभाऊ ताडे, बळीराम भगत यांचा सपत्निक शाल, श्रीफळ, व सौ. यांना साडी आणि कायदा 2000 घटनेशी लबाडी हे माजी उपसचिव बी. के. हेडाऊ यांचे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ऑफ्रोह कोकण विभागीय समितीवर सहसचिव म्हणून निवड झाल्याबद्दल गजानन उमरेडकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. Afroh and Women’s Aghadi monthly meeting

यावेळी ऑफ्रोह रत्नागिरीचे सदस्य हेमराज सोनकुसरे, देवकीनंदन सपकाळे, अरूण बावीसकर, पंढरी पपुलवार, सतीश घावट, विलास घावट, तुळशीराम केळधणे, विलास देशमुख, सुरेखा घावट, प्रतिभा रोडे, शोभा घावट, आशा ताडे, प्रियंका इंगळे, बंडूभाऊ चेचरे, बळीराम भगत, श्रीकृष्ण भांडे, गजानन रामगडे व इतर सभासद उपस्थित होते. Afroh and Women’s Aghadi monthly meeting

Tags: Afroh and Women's Aghadi monthly meetingGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share65SendTweet41
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.