पालशेतच्या समुद्रावर साहसी खेळांचे उद्घाटन
गुहागर, ता. 30 : पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी जेट स्की द्वारे सागरी साहसी खेळांची सुविधा गाज रिसॉर्टतर्फे सुरु करण्यात आली आहे. या सुविधेचे उद्घाटन गुरुवारी (ता. 29) सायंकाळी करण्यात आले. या सुविधेमुळे पर्यटकांचे पाय पालशेतच्या समुद्रकिनाऱ्याकडे वळतील. त्यातून पालशेतमध्येही पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. अशी अपेक्षा लायन्स क्लबचे अध्यक्ष शामकांत खातू यांनी व्यक्त केली. Adventure sports on the sea of Palshet
गाज रिसॉर्टने वर्षअखेरीस पालशेतच्या पर्यटन विकासात आणखी भर घातली आहे. सी स्टॉर्म व सी स्पिरिट या दोन नविन जेट स्की द्वारे सागरी साहसी खेळ सुविधा 30 डिसेंबर 2022 पासून पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरु होत आहे. सध्या सकाळी 8 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 6 या वेळेत जेट स्कीद्वारे समुद्रसफरीचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. Adventure sports on the sea of Palshet

सागरी साहसी खेळांच्या पालशेत किनाऱ्यावरील सुविधेचे उद्घाटन गुरुवारी (ता. 29) पारंपरिक पध्दतीने करण्यात आले. जीतेंद्र जोशी यांनी सुरवातीला सागरपुजन त्यानंतर दोन्ही जेटस्कींचे पूजन केले. त्यानंतर पालशेतचे उपसरपंच महेश वेल्हाळ, उद्योजक राजन दळी, लायन्स क्लबचे अध्यक्ष शामकांत खातू, गुहागर शहर व्यापारी संघटना अध्यक्ष नरेश पवार, पालशेतमधील हॉटेल व्यावसायिक पांडुरंग विलणकर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. Adventure sports on the sea of Palshet

यावेळी आंबा बागायतदार विलास ओक (महाजन), नरवणचे डॉ. कैलास वैद्य व सौ. मधुरा वैद्य, सरपंच सौ. संपदा चव्हाण, पंकज बीर्जे, पद्मनाभ जोशी, नरेंद्र नार्वेकर, महेश तोडणकर, सौ. श्रीया सोमण, केदार सोमण, बाबासाहेब राशिनकर, नाखरे गुरुजी, सिताराम पटेकर, सौसारिका जोशी, पुरोहित राहुल ओक उपस्थित होते. Adventure sports on the sea of Palshet

उद्घाटनानंतर जेटस्कीवरुन पहिली समुद्र सफर करण्याचा मान ई 4 थी मध्ये प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झालेला अर्णव पाटील, इ. 3 री मध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी शालवी तोडणकर आणि जिल्हास्तरीय वक्त्तृत्त्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारी पालशेतकर विद्यालयाची विद्यार्थीनी प्रगती जोशी यांना देण्यात आला. Adventure sports on the sea of Palshet

यावेळी मनोगत व्यक्त करताना जीतेंद्र जोशी म्हणाले की, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड तसेच पर्यटन विभागाच्या सर्व परवानग्या घेऊन ही सुविधा पालशेत समुद्रकिनारी आपण सुरु केली आहे. या कामासाठी मेरीटाईम बोर्डाचे क्षेत्रीय बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले यांचे मार्गदर्शन आणि योगदान मिळाले. या सुविधेमुळे पालशेतमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. त्यातून रोजगार निर्मिती होईल. Adventure sports on the sea of Palshet

