श्री विठ्ठलाईदेवी मंडळातील सात बलुतेदार समाज जोपासतोय सामाजिक ऐक्य
गुहागर, ता. 29 : सामुहिक कार्यक्रमाद्वारे सर्व स्तरांतील समाजाला संघटीत ठेवता येते. अशीच परंपरा गुहागर तालुक्यातील अडूर येथील श्री.विठ्ठलाईदेवी मंडळातील सात बलुतेदार समाज एकत्रित असलेल्या संघटनेने जोपासली आहे. या मंडळाच्या वतीने दरवर्षी घरगुती गौरी गणपतींच्या मुर्तींचे सामुहिक विसर्जन सोहळा संपन्न होतो. याच दरम्यान कोकणी ठोंबरी लोककलेचे सुद्धा येथील ग्रामस्थ सामुहिकपणे सादरीकरण करून मागील पिढीकडून आलेला सांस्कृतिक वारसा जपत आहेत. Adur residents kept the tradition
आधुनिक युगात वावरताना येथील ग्रामस्थ संघटीतपणे जोपासत असलेली ही परंपरा निश्चितच कौतुकास्पद आहे. ठोंबरी ही लोककला फेर धरून सादर केली जाते. या मंडळातील सात बलुतेदार समाज एकत्रित असलेल्या तेली, नाभिक, कुणबी, कुंभार, सोनार, सुतार व गुरव या मंडळाची पिढ्यानपिढ्या चालत आलेली गौरी गणपतींच्या मुर्तींचे सामुहिक विसर्जन परंपरा आजही कायम आहे. येथील पाच दिवसीय गौरी गणपती मुर्तींचे विसर्जन सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी या सामुहिक विसर्जन सोहळ्याकरिता येथील सात बलुतेदार समाजातील सर्व लोक घरगुती विराजमान झालेले गौरी गणपती घेऊन अडूर बाजारपेठ जुनी सहाण येथील भव्य पटांगणात एकत्रित जमतात. त्याठिकाणी सर्व गौरी गणपतींची बैठक करून त्यांच्या भोवती दरवर्षी कोकणी ठोंबरी (ठुंबरी) लोककला सादर केली जाते. Adur residents kept the tradition
यावेळी या सात बलुतेदार समाज एकत्रित असलेल्या मंडळातील पुरुष मंडळी पारंपारिक लोकगीते म्हणत पखवाजाच्या तालावर फेर धरतात. त्यानंतर सदर ग्रामस्थ दोन किलोमीटर अंतरावरील गाव तलावावर गौरी गणपती मूर्ती डोक्यावरून घेऊन मंडळाच्या वारकरी भजनाने टाळ- मृदुंगाच्या गजरात विसर्जनस्थळी नेऊन त्यांना भावपूर्ण वातावरणात निरोप देतात. Adur residents kept the tradition