अध्यक्ष, गोपाळ झगडे तर उपाध्यक्ष, सचिन साळवी
गुहागर, ता. 21 : गुहागर तालुक्यातील अडूर येथील पिढ्यानपिढ्या सात बलुतेदार समाज एकत्रित असलेल्या (तेली, नाभिक, कुणबी, कुंभार, सोनार, सुतार व गुरव) या श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ, अडूर (रजि.) ची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. Adur Gram Vikas Mandal Executive

या मंडळाच्या कार्यकारिणी मध्ये अडूर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष गोपाळ झगडे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष पदी सचिन साळवी, अडूर सोसायटीचे सचिव विजय स. झगडे यांची कार्यवाह पदी, शिक्षक कल्पेश धावडे यांची सह कार्यवाह पदी, खजिनदार- परेश कदम, सह खजिनदार- प्रदीप झगडे, सदस्य – वैभव धावडे, रमेश आंबेकर, नरेश आंबेकर, तुषार झगडे, स्वप्निल दहिवलकर यांची निवड झाली. या सर्वांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. Adur Gram Vikas Mandal Executive

विद्यमान कार्यकारिणी सन २०२२ ते सन २०२५ या तीन वर्ष कालावधी करिता राहील. श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ हे नेहमीच सामाजिक, धार्मिक, क्रिडा व अन्य क्षेत्रात अग्रेसर असते. मंडळाला मागील पिढीकडून मिळालेला सांघिक वारसा असाच पुढे एकजुटीने नेण्याचा आमचा प्रयत्न राहील असे विद्यमान नूतन पदाधिकारी यांनी सांगितले. माहे २०२३ मध्ये असणारा श्री विठ्ठलाईदेवीचा शतक महोत्सव तसेच या कार्यकारिणी कालावधीत विविध समाजाभिमुख नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. Adur Gram Vikas Mandal Executive

