रत्नागिरी, ता. २3 : राष्ट्रीय सेवा समितीच्या सन्मित्र नगरमधील (कै.) सौ. विमलताई पित्रे विद्यार्थिनी वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जून २०२३ पासून चालू शैक्षणिक वर्षासाठी या वसतीगृहात प्रवेश दिले जात आहेत. इयत्ता अकरावीपासून पुढील कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनी या वसतिगृहात प्रवेश घेऊ शकतात. वसतिगृहाची प्रवेश क्षमता ५० आहे. Admission to Vimaltai Pitre Hostel in Ratnagiri begins
राष्ट्रीय सेवा समिती ही नोंदणीकृत धर्मादाय संस्था आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून सन १९८९ पासून रत्नागिरी जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम सातत्यपूर्ण राबवत आहे. (कै.) बंडोपंत लिमये यांनी संस्थेला दान दिलेल्या सन्मित्रनगर येथील वास्तूमध्ये मागील सुमारे ३३ वर्षांपासून संस्थेचे विद्यार्थिनी वसतिगृह सुरू आहे. सुरक्षित, संस्कारक्षम निवास आणि भोजन व्यवस्था तीदेखील माफक व वाजवी शुल्कामध्ये हे या वसतिगृहाचे ठळक वैशिष्ट्य आहे. Admission to Vimaltai Pitre Hostel in Ratnagiri begins

मागील काही वर्षांमध्ये रत्नागिरी हे कोकण प्रांतातील शैक्षणिकदृष्ट्या महत्वाचे शहर म्हणून वेगाने नावारूपाला येत आहे. यादृष्टीने शहरामध्ये विद्यार्थिनी वसतिगृहाची काळानुरूप वाढती गरज तसेच संस्थेच्या महिला सक्षमीकरणाबाबत असलेला दृष्टीकोन यातून राष्ट्रीय सेवा समितीने विद्यार्थिनी वसतिगृहाच्या तळमजला अधिक दोन मजले असलेली नवीन सुसज्ज इमारत बांधून पूर्ण केली. संस्थेच्या नियम व अटींना अधीन राहून वसतिगृहात प्रवेश देण्यात येईल. वसतिगृहाचे मासिक शुल्क दरमहा रुपये ४५०० रुपये आहे. यामध्ये निवास, दोन वेळचा चहा, दोन वेळ शाकाहारी जेवण, एक वेळ नाश्ता याच्या शुल्काचा समावेश असेल. Admission to Vimaltai Pitre Hostel in Ratnagiri begins
वसतिगृहाची प्रमुख वैशिष्ठ्ये
तळमजला अधिक दोन मजले असे सुमारे ९००० चौ. फुटाचे सुसज्ज व हवेशीर बांधकाम. सेल्फ कन्टेंट विद्यार्थिनी कक्ष संख्या – १८ (एका कक्षात ३ विद्यार्थिनी). तळमजल्यावर ५०० चौ. फुटाचे सुसज्ज भोजन व स्वयंपाकगृह, १२०० चौ. फुटाचे सुसज्ज सभागृह.

या सुसज्ज वसतिगृहामुळे ग्रामीण भागातून तसेच अन्य गावातून शिक्षणासाठी रत्नागिरीत येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात उत्तम सोय उपलब्ध होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क वेळ सकाळी ११ ते २ या वेळेत संतोष ज. पावरी (अध्यक्ष, ९०११५६४३३२), आनंद मा. मराठे (उपाध्यक्ष, ९४२२४३१४९०), अनिरुद्ध वि. लिमये (कार्यवाह ९४२२४३३७१७), अॅड. प्रशांत बा. पाध्ये (कोषाध्यक्ष ९४२२६३५८०४), दत्तात्रय पुरोहित (वसतिगृह प्रकल्प प्रमुख ९७३०४२७९९९), सौ. नेहाताई जोशी (वसतिगृह समिती सदस्य ९४०३१०२२९८) यांच्याशी संपर्क साधावा. Admission to Vimaltai Pitre Hostel in Ratnagiri begins
