जुलै ते डिसेंबर २०२३ या शैक्षणिक सत्राकरीता व्यवसायांचे प्रशिक्षण
रत्नागिरी, ता. 09 : ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील १६ ते ३५ वयोगटातील युवक/युवतीना तसेच दारिद्रय रेषेवरील युवक / युवतींच्या तांत्रिक शिक्षणाकरीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रत्नागिरी या कार्यालयाच्या अधिपत्याखाली चालविण्यात येणारे ट्रायसेम ट्रेनिंग सेंटर. आय.टी.आय. आवार, नाचणे रोड, रत्नागिरी येथे जुलै ते डिसेंबर २०२३ या शैक्षणिक सत्राकरीता खालील व्यवसायांचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. तरी इच्छूक युवक / युवतीनी याचा लाभ घ्यावा. Admission to Trisem Training Center begins

या प्रशिक्षणामध्ये मोटर अॅण्ड आर्मेचर रिवायंडींग, ऑफिस फर्निचर मेकींग अॅण्ड रिपेअरींग, हाऊस पाईप फिटींग या व्यवसायासाठी शैक्षणिक पात्रता किमान सातवी पास व मोटर अॅण्ड सव्हिसिंग ऑफ रेडिओ अॅण्ड एलसीडी, एलईडी टीव्ही या व्यवसायासाठी शैक्षणिक पात्रता एसएससी प्रवेशित आहे. प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने मुदतीचा असून संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळ, मुंबई यांच्यामार्फत परिक्षा घेण्यात येईल व परीक्षेत उत्तीर्ण होणा-या प्रशिक्षणार्थ्यांना मंडळामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल. Admission to Trisem Training Center begins

दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थीना दरमहा नियमाप्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल. दारिद्रय रेषेवरील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतन सवलत मिळणार नाही. शासकीय नियमानुसार असणारे दरमहा शैक्षणिक शुल्क (फी) त्यांना भरावी लागेल. रत्नागिरी बाहेरील प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधीमध्ये राहण्यास वसतिगृहाची सोय उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय अथवा तालुका पंचायत समिती कार्यालय, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रत्नागिरी फोन नं. (०२३५२- २२२५३०) अथवा ट्रायसेम ट्रेनिंग सेंटर, आय. टी. आय. आवार, नाचणे रोड, रत्नागिरी मोबा. नं. ९८८१७६२५२६ / ९४२११८८९५७ या ठिकाणी ३० जून २०२३ पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य ट्रायसेम ट्रेनिंग सेंटर, रत्नागिरी यांनी केले आहे. Admission to Trisem Training Center begins
