रत्नागिरी दि. 7 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथील प्रवेश प्रक्रिया १२ जूनपासून सुरु करण्यात आली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ११ जुलैपर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे फ्रंट ऑफिस असिस्टंट, मेकॅ. डिझेल, कोपा, पीओसीएम, आयडीडी, डीटीपी , एफपीजी( Food Prduction General), स्युइंग टेक्नॉलॉजी हे एक वर्ष कालावधीचे व्यवसाय आहेत. Admission to Ratnagiri ITI by 11th July

स्युइंग टेक्नॉलॉजी, वेल्डर, कारपेंटर (wood work Technician) या व्यवसायांकरिता शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण/ अनुत्तीर्ण अशी आहे. तसेच वायरमन या दोन वर्ष व्यवसायाकरिता दहावी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आहे व इतर सर्व व्यवसायांकरीता दहावी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आहे. इंफॉरमेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटेनन्स, इलेक्ट्रीशियन, मेकं मोटर व्हेईकल, आरएसीटी, ड्रॉसमन सिव्हील, ड्रॉसमन मेकॅ., फिटर, टर्नर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राईंडर, वायरमन, एमएमटीएम, इन्स्ट्रूमेंट मेकॅ., या व्यवसायाकरिता दोन वर्षाचा कालावधी आहे. Admission to Ratnagiri ITI by 11th July

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात वरील संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेशासंबंधी अधिक माहितीकरिता प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी एम. एम. कदम-( मो. नं. 9607408401) यांच्याशी संपर्क साधावा. Admission to Ratnagiri ITI by 11th July
