गुहागर, ता. 02 : गुहागर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर पोलीस कर्मचारी प्रमोद पांडुरंग मोहिते यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती करण्यात आली. त्यांच्या बढतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे. महाराष्ट्र दिनी गुहागर येथे गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्यावतीने त्यांना बढतीचा सन्मान प्रदान करण्यात आला. Mohite’s post as Sub-Inspector of Police
प्रमोद पांडुरंग मोहिते हे १९८८ साली पोलीस खात्यात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर. गडचिरोली अशा नक्षलग्रस्त भागात आपली सेवा बजावली विशेष म्हणजे त्यांनी शरद पवार हे संरक्षण मंत्री असताना त्यांचा बॉडीगार्ड म्हणून कामही केले आहे. गेली पाच वर्ष ते गुहागर पोलीस ठाण्यात कार्यरत असून गुहागर तालुक्यातील वाहतूक नियंत्रण विभाग व्यवस्थितपणे सांभाळत आहेत. एक कार्य तत्पर व कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्यामुळे गुहागर तालुक्यातील शृंगारतळी या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेला मोठी शिस्तही लागली आहे. एक मे कामगार दिनी त्यांना पोलीस उपनिरीक्षक या पदावर बढती मिळाली असून त्यांचे नियुक्ती ठिकाणी गुहागरच ठेवले आहे. त्यांना मिळालेल्या या बढतीमुळे त्यांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. Mohite’s post as Sub-Inspector of Police