रत्नागिरी ता. 08 : सन 2023-24 साठी मागासवर्गीय मुला- मुलींच्या शासकीय वसतीगृहातील रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश प्रक्रियाबाबत विद्यार्थी, विद्यार्थीनीकडून ऑफलाईन पध्दतीने अर्जाची नोंदणी करण्यात येत आहे. वसतीगृह प्रवेश अर्ज विनामुल्य प्राप्त करून घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत संबंधित वसतीगृहातील गृहपाल, अधिक्षिका व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, रत्नागिरी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन यादव गायकवाड सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी यांनी केले आहे. Admission Procedure in Government Hostel

शालेय विद्यार्थ्यांनी ऑफलाईन प्रवेशासाठी 12 जुलै पर्यंत अर्ज करावयाचा असून पहिली निवड यादी 14 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्याच्या प्रवेशाची अंतिम मुदत 23 जुलै आहे. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवतेनुसार निवड यादी 26 जुलै 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना 2 ऑगस्ट पर्यंत प्रवेश देण्यात येईल. Admission Procedure in Government Hostel

बी.ए./बी. कॉम/ बी.एस.सी अशा बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका /पदवी आणि एम.ए./एम.कॉम / एम.एस.सी. असे पदवीनंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी 31 जुलै पर्यंत अर्ज करावयाचा असून पहिली निवड यादी 7 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्याच्या प्रवेशाची अंतिम मुदत 17 ऑगस्ट आहे. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवतेनुसार निवड यादी 23 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना 31ऑगस्ट पर्यंत प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती समाजकल्याण कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. Admission Procedure in Government Hostel
