महाज्योती अंतर्गत पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने
नागपूर ता. 23 :- महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्याथ्यांकडून MHT-CET/ JEE /NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. सदर प्रशिक्षणात संबंधित परीक्षेतील गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयाच्या तज्ञ व अनुभवी प्रशिक्षका मार्फत ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या उमेदवारांना टॅबची सुविधा देण्यात येते. त्यासाठी लागणाऱ्या 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येतो. प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या दर्जेदार अभ्यास साहित्य घरपोच देण्यात येतो. Admission for MHT-CET /JEE / NEET 2025 Training
योजनेच्या लाभासाठी पात्रता
1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा / असावी.
2. उमेदवार हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गापैकी असावा/असावी.
3. उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी.
4. जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परिक्षा देत आहेत त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 10 वी चे प्रवेश पत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी.
5. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने अपलोड करणे आवश्यक आहे. Admission for MHT-CET /JEE / NEET 2025 Training
आवश्यक कागदपत्रे
1. इयत्ता 9 वी ची गुणपत्रिका
2. दहावीची गुणपत्रिका, ओळखपत्र
3. विद्यार्थ्याने 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा (बोनाफाईड प्रमाणपत्र)
4. आधार कार्ड
5. रहिवासी दाखला
6. जातीचे प्रमाणपत्र
7. नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
(याच्या प्रती अपलोड करणे बाकी असल्यास अपलोड करणे बंधनकारक राहील.) Admission for MHT-CET /JEE / NEET 2025 Training
अर्ज कसा करावा
1. महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for MHT / CET JEE / NEET 2025 Training यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
2. अर्जामध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षाकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करावी. Ti www.https://mahalyoti.org.in/application-for-mat-cet-dee/ महाज्योतीच्या साईटवर 31 मार्चपर्यंत अपलोड करावीत. असे व्यवस्थापक, महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) महाराष्ट्र राज्य, नागपुर यांनी कळविले आहे. Admission for MHT-CET /JEE / NEET 2025 Training