• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 June 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणेशोत्सवासाठी ठाणे स्थानकात दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या

by Mayuresh Patnakar
June 19, 2026
in Maharashtra
30 0
0
58
SHARES
167
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 19 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची तयारी करणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी यंदा एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वेच्या तिकिटांसाठी दरवर्षी ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रावर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन ११ जुलै २०२६ पासून स्थानकात दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे आरक्षणासाठी तासंतास रांगेत उभे राहण्याची वेळ कमी होणार आहे. Additional reservation windows at Thane station

सुरक्षेच्या उपाययोजना आरक्षण केंद्रातील वाढती गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या उपाययोजनांवरही भर देण्यात आला आहे. आरक्षण केंद्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपीच्या जवानांना या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे आरक्षण प्रक्रियेदरम्यान होणारी धक्काबुक्की, गैरव्यवहार किंवा अन्य अनुचित प्रकारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. प्रवास तुलनेने स्वस्त, सुरक्षित आणि आरामदायी असतो. शिवाय या काळात खासगी बससेवांचे दर अनेकदा दुप्पट-तिप्पट वाढतात. त्यामुळे बहुसंख्य प्रवासी रेल्वे आरक्षणालाच प्राधान्य देतात. परिणामी ठाणे, दादर यांसारख्या स्थानकांवरील आरक्षण केंद्रांवर मोठी गर्दी होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या स्थानकात पाच आरक्षण खिडक्या कार्यरत आहेत. त्यामध्ये आता दोन अतिरिक्त खिडक्यांची भर पडणार आहे. ११ जुलैपासून या खिडक्या सुरू झाल्यानंतर एकूण सात खिडक्यांमधून आरक्षण सेवा उपलब्ध होणार आहे. Additional reservation windows at Thane station

Tags: Additional reservation windows at Thane stationGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share23SendTweet15
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.