बिल गेट्स, मुकेश अंबानी पेक्षा अधिक संपत्ती; ‘फोर्ब्स’ची यादी जाहीर
नवी दिल्ली, ता. 22 : अदानी ग्रुप’चे प्रमुख गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ११५.४ अब्ज डॉलर असून त्यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि एकेकाळचे जगातील सर्वात धनाढ्य असलेल्या बिल गेट्स यांनाही मागे टाकले आहे. अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यापेक्षा त्यांची संपत्ती अधिक आहे. Adani is the fourth richest
‘फोर्ब्स’ने जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केली. टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपन्यांचे संस्थापक एलोन मस्क हे या यादीत अव्वल स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २३४.४ अब्ज डॉलर आहे. बर्नाड अॅर्नो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईस व्हुताँ हे १५५.७ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या तर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बझ हे १४९.९ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चौथ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांनी संपत्ती वाढता वाढत आहे. Adani is the fourth richest
या वर्षी ४ एप्रिल रोजी गौतम अदानी यांनी १०० अब्ज डॉलरचा टप्पा गाठल्याने ती जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले होते. तीन महिन्यांत त्यांच्या संपत्तीत १५ अब्ज डॉलरची भर पडली. २०२१ मध्ये त्यांची संपत्ती केवळ ४९ अब्ज डॉलर होती. त्यानंतर त्यांच्या संपत्तीत दर आठवड्याला ६००० कोटी रुपयांची भर पडत गेली, असे हुरून धनाढ्य यादीचा अहवाल सांगतो. मुकेश अंबानीना मागे सोडले. अंबानी या यादीत १० व्या क्रमांकावर घसरले आहेत. बिल गेट्स यांची संपत्ती १०४.२ अब्ज डॉलर असून त्यांच्यापेक्षा अदानी ११ अब्ज डॉलरने यांची संपत्ती अधिक आहे. Adani is the fourth richest
गेल्या दोन वर्षांत अदानी समूहाचे काही शेअर्स ६०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. यामध्ये ग्रीन एनर्जीशी संबंधित काही स्टॉक्सचाही समावेश आहे. अदानी समूहाने अवघ्या तीन वर्षांत सात विमानतळांवर आणि भारतातील सुमारे एक चतुर्थांश हवाई वाहतुकीवर नियंत्रण मिळवले आहे. अदानी समूहाकडे आता देशातील सर्वात मोठे विमानतळ ऑपरेटर, पॉवर जनरेटर आणि बिगर-राज्य क्षेत्रातील सिटी गॅस रिटेलर आहे. Adani is the fourth richest