व्याडेश्वर देवस्थानचा उपक्रम ; दि.12 ते 18 सप्टेंबर सायं. 5 ते 6:30 वेळेत
गुहागर, ता. 09 : श्री देव व्याडेश्वर देवस्थानमध्ये सोमवार दिनांक 12 सप्टेंबर ते रविवार 18 सप्टेंबर या कालावधीत ग्रंथराज ‘दासबोध या विषयावर प्रवचने होणार आहेत. ही प्रवचने देवस्थानच्या परशुराम सभागृहात सायंकाळी 5 ते 6:30 वेळेत होताल. तरी दासबोध अभ्यासक, साधक यांच्यासह तालुकावासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री देव व्याडेश्वर देवस्थानने केले आहे. Activities of Vyadeshwar Temple

गेली अनेक वर्षे श्री देव व्याडेश्वर देवस्थान तर्फे पितृपंधरवड्यात अध्यात्मिक विचार साध्या सोप्या भाषेत सामान्य जनतेला कळावा. म्हणून किर्तन, प्रवचन असे कार्यक्रम करते. अशा कार्यक्रमांना आध्यात्मिक क्षेत्रातील अभ्यासकांना बोलावले जाते. यावर्षी राष्ट्रगुरू समर्थ रामदासस्वामी यांनी लिहिलेल्या ग्रंथराज ‘दासबोधाचा परिचय व्हावा, म्हणून सलग 7 दिवस याच ग्रंथावर प्रवचने होणार आहेत. त्यासाठी सज्जनगडावरील श्री अजेयबुवा रामदासी आणि श्री योगेशबुवा रामदासी हे येणार आहेत. Activities of Vyadeshwar Temple
गुहागर तालुक्यात प.पू. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठक परिवाराचे अनेक अनूयायी आहेत. गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी दासबोधदाचे अभ्यासक आहेत. दासबोधाचे पारायणही अनेक ठिकाणी होते. यासर्वांसाठी पितृपंधरवड्यात आयोजित दासबोधावरील प्रवचनांचा कार्यक्रम ही मोठी उपलब्धी आहे. Activities of Vyadeshwar Temple

श्री अजेयबुवा रामदासी आणि श्री योगेशबुवा रामदासी यांच्या अभ्यासपूर्ण प्रवचनांचा लाभ घेण्यासाठी सोमवार दिनांक 12 सप्टेंबर ते रविवार 18 सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी 5 ते 6:30 वेळेत व्याडेश्वर देवस्थानच्या परशुराम सभागृहात उपस्थित रहावे. असे आग्रहाचे निमंत्रण व्याडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष शार्दुल भावे व संचालक केदार खरे यांनी केले आहे. Activities of Vyadeshwar Temple
