गुहागर, ता. 12 : आजी-माजी सैनिक कल्याण समिती, रत्नागिरी जिल्हास्तरीय रत्नसैनिक संघटनेच्या माध्यमातून परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित युनायटेड इंग्लिश स्कुल चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी विशेष मार्गदर्शन शिबीर नुकतेच गुरुदक्षिणा सभागृह युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण येथे मोठया उत्साहात संपन्न झाले. Activities of Ratnasainik Association


या शिबिरात मुख्य वक्ते निवृत्त लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके यांनी अधिकारी पदासाठीचे विकल्प, संधी, अभ्यासाची कार्यपद्धती याबाबत उदाहरणासह मार्गदर्शन केले. राज्यातील व देशातील राष्ट्रीय मिल्ट्री स्कूल प्रबोधिनी, आय एम ए, राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी, अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनी, छात्र पूर्वप्रशिक्षण केंद्र, सर्विस सिलेकशन बोर्ड अशा शैक्षणिक व प्रशिक्षणार्थ संस्थांची माहिती दिली. शिबिराचे प्रथम सत्रात डी. बी. जे. महाविद्यालय एनसीसीचे 28, युनायटेड इंग्लिश स्कूल एनसीसीचे 24 व इयत्ता- आठवी, दहावीचे 279 व सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मेडीयम स्कूल चे ७४ असे एकूण सुमारे ४५० विध्यार्थ्यानी मार्गदर्शनाचा लाभ घेतला. तर द्वितीय सत्रात सती चिंचघरी हायस्कूलचे ४७, मेरी माता स्कूलचे १९, ख्रिस ज्योती हायस्कूलचे ११, टेरव हायस्कूलचे ४, मोतीवाले परांजपे हायस्कूल व इतर २९ मुलांनी व पालकांनी सहभाग नोंदविला. Activities of Ratnasainik Association


मार्गदर्शन शिबिरात युनायटेडचे माजी विद्यार्थी आणि निवृत्त लेफ्टनंट कर्नल स्वानंद दामले हे आवर्जून उपस्थित होते. स्कॉडर्न लीडर रवींद्र अंधारे वैद्यकीय अधिकारी ई. सी. एच. एस. पोलिक्लिनिक चिपळूण यांची उपस्थिती लाभली. परशुराम एज्यूकेशन सोसायटीचे कार्यकारी मंडळ पदाधिकारी यांनी या शिबिरासाठी गुरुदक्षिणा सभागृह उपलब्ध करून दिला. यु. इ. स्कूल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वप्नाली पाटील, उपमुख्याध्यापक बनसोडे, पर्यवेक्षिका सौ. कारदगे, यु. इ. स्कूल एनसीसीचे विभागप्रमुख फर्स्ट ऑफिसर संदीप मुंढेकर यांचे शिबीर यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष सुभेदार सुधीर भोसले यांचे नेतृत्वात संघटनेच्या सर्व सभासदांनी केले. Activities of Ratnasainik Association