गुहागर, ता. 11 : शृंगारतळी येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदासभाई कदम, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृवावर विश्वास ठेवून गुहागर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व काँग्रेस मधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षांसह सरपंच, उपसरपंच, कार्यकारिणी पदाधिकारी यांचा समावेश आहे. Activists join Shiv Sena
राज्यात शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिंदे गटाला अधिकृतपणे शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर तालुक्यात पहिलाच जाहीर मेळावा घेण्यात आला. पहिल्याच मेळाव्यात मतदार संघातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गुहागर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर, वरवेली गावच्या उपसरपंच सौ. मृणाल विचारे, गुहागर खालचापाट प्रभाग क्रमांक 17 मधील उबाठा गटाचे श्रीरंग वराडकर, युवासेना उपशहरप्रमुख केदार वराडकर, सिद्धार्थ वराडकर आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शहराप्रमुख निलेश मोरे, युवासेना जिल्हा समन्वयक अमरदीप परचुरे, राकेश गावडे, राकेश साखरकर, अमोल गोयथळे यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश केला. रामदास कदम यांनी या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. Activists join Shiv Sena