• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

एलईडी लाईटचा पुरवठा करणाऱ्या बोटीवर कारवाई

by Guhagar News
April 25, 2025
in Ratnagiri
164 2
0
Action on boats supplying LED lights
322
SHARES
920
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दाभोळ समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई

रत्नागिरी, ता. 25 : दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील समुद्रात दुसऱ्या बोटींना एलईडी लाईट पुरवणाऱ्या बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून गुरुवारी रात्री कारवाई करण्यात आली आहे. या बोटीवर दोन तांडेल आणि दोन खलाशी सुद्धा आढळून आहे. Action on boats supplying LED lights

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर अनधिकृत मासेमारी आणि एलईडी मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मत्स्यविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री म्हणजेच दि. 25/4/2025 रोजी रात्री 00.45 च्या सुमारास बुरोंडी समोर 11.5 सागरी माइल्स मधे मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्रीम. दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ) हे गस्त घालत होते. यावेळी राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली नझीम अली जांभारकर, (रा. पडवे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी ) यांची नौका- साबीर, नों. क्र. IND-MH-4-MM-493 द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात बुरोंडी समोर अनधिकृतरित्या एल. ई.डी. लाईटचा वापर करताना पकडण्यात आली. या नौकेवर नौका तांडेलसह 2 खलाशी होते. Action on boats supplying LED lights

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अधिनियम 2021 अंतर्गत एल.ई. डी. नौकेवर कारवाई करून सदर नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली आहे. त्यावर मासळीचा आढळून आलेली नाही. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त केली आहेत. सदर कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी सागर कुवेस्कर व मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, रत्नागिरी आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी श्रीम. दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ) सागरी सुरक्षा पर्यवेक्षक, सागरी सुरक्षा रक्षक व गस्ती नौका रामभद्रा वरील कर्मचारी यांचे सहकार्याने सदर कारवाई करण्यात आली आहे. Action on boats supplying LED lights

Tags: Action on boats supplying LED lightsGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share129SendTweet81
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.