• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यावर केली कारवाई

by Ganesh Dhanawade
May 22, 2025
in Guhagar
246 3
0
Action against those who throw garbage on the road
484
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कारवाई केली म्हणून पुन्हा त्याच ठिकाणी टाकला कचरा

गुहागर, ता. 22 : गुहागर नगरपंचायत घरोघरी कचरा संकलनासाठी वाहन व सोबत कर्मचारी पाठवत असताना गुहागर चिपळूण मार्गावर रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्या गुहागर आगार कर्मचाऱ्यावर गुहागर नगरपंचायतीने दोनशे रुपये दंडाची कारवाई केली आहे. मात्र या कारवाईमुळे उचलून नेलेला कचरा पुन्हा त्याच ठिकाणी टाकून या कर्मचाऱ्याने आपला मुजोरपणा दाखवला आहे. यामुळे आता गुहागर नगरपंचायत पुढील कोणती कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. Action against those who throw garbage on the road

Action against those who throw garbage on the road

गुहागर चिपळूण मार्गावर समर्थ बैठक यांच्या वतीने स्वच्छता अभियान घेण्यात येते. शहरातील संस्था कॉलेजचे विद्यार्थी यांनी स्वच्छता मोहीम राबवून गुहागर समुद्र किनारे त्याचबरोबर मुख्य रस्ते स्वच्छ केले मात्र बेजबाबदार नागरिकांनी पुन्हा रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याची शृंखला सुरूच केली आहे. यामुळे गुहागर नगरपंचायतीने कडक धोरण अवलंबिले आहे. बुधवारी 11:00 वाजताच्या दरम्याने गुहागर आगारातील वाहक म्हणून काम करणारे रमेश ढाले हे खुलेआम रस्त्याच्या कडेला कचरा टाकत होते. कचरा टाकत असताना पकडले गेल्याने गुहागर नगरपंचायतीने त्यांना रुपये 200 दंड लावून कारवाई केली. मात्र या कारवाईने मुजोरपणा दाखवून रमेश ढाले यांनी सायंकाळी 6:00 वाजता दरम्याने घरी नेलेला तो कचरा पुन्हा रस्त्याच्या कडेला आणून टाकला आहे. Action against those who throw garbage on the road

याबाबतची तक्रार गुहागर नगरपंचायतीमध्ये देण्यात आले असून आत्ता यावर गुहागर नगरपंचायत कोणती कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. कारवाई झाली म्हणून पुन्हा तोच कचरा आणून रस्त्याच्या कडेला टकणे या मुजोरपणामुळे आत्ता स्वच्छतेमध्ये सहभाग घेणाऱ्या सर्वांसमोरच हे आव्हान बनले आहे. अशा पद्धतीच्या विकृतीवर प्रशासन नक्की कोणती कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. Action against those who throw garbage on the road

Tags: Action against those who throw garbage on the roadGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share194SendTweet121
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.