गुहागर, ता. 18 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायत व तंटामुक्त समिती यांच्या संयुक्त कारवाईत शृंगारतळी आठवडा बाजारात प्लास्टीक पिशवीतून वस्तू देणार्या विक्रेत्यांकडून सुमारे ८ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. Action against plastic bag sellers
पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त परिसराच्या उद्देशाने पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने शृंगारतळी येथील आठवडा बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविली. या कारवाईदरम्यान बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणार्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विविध व्यावसायिकांची तपासणी करून प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला. Action against plastic bag sellers
पर्यावरणाला घातक ठरणार्या प्लास्टिकचा वापर व विक्री रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित विक्रेत्यांकडून एकूण ०८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीच्या अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी व्यापार्यांना शासनाच्या प्लास्टिकबंदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच कापडी, कागदी किंवा इतर पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला. भविष्यात अशा प्रकारे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री किंवा वापर आढळून आल्यास संबंधितांवर अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला. Action against plastic bag sellers
परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत सातत्याने जनजागृतीबरोबरच नियमित तपासणी मोहिमाही राबविणार असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमुळे बाजारपेठेतील व्यापार्यांमध्ये नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून, पर्यावरण संरक्षणासाठी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. या संयुक्त कारवाईत उपसरपंच असीम साल्हे, ग्रामविकास अधिकारी सुलभा बडद, लिपिक कर्मचारी सुदेश हडकर, ग्रा.पं. सदस्य सुरेश तेलगडे, शब्बीर शेख, सचिन राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष अजित बेलवलकर सहभागी झाले होते. Action against plastic bag sellers
