गुहागर तालुक्यातील 2019 मधील घटना
गुहागर, ता. 25 : सात वर्षाच्या बालीकेवर बलात्कार व लैंगिक अत्याचार प्रकरणी गुहागर तालुक्यातील आरोपी प्रकाश शंकर वाघे (वय ४० वर्षे) यास जन्मठेप व रक्कम रुपये २५०००/- दंड अशी शिक्षा चिपळूण येथील जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधीश डॉ. अनिता श्रीरंग नेवसे यांनी ठोठावली आहे. सदरील घटना दि. ६ ऑक्टोबर २०१९ रोजी घडली होती. Accused in rape case life imprisonment
ऑक्टोबर २०१९ मध्ये गुहागर तालुक्यातील एका गावात लहान मुलीवर अत्याचार झाला होता. ७ वर्षाची पीडीत बालीका आपल्या भावासोबत व शेजारील मुलासोबत घराशेजारी खेळत होती. त्यावेळी आरोपी प्रकाश वाघे तिथे आला व लाकडे शोधायला गुरांच्याकडे चल असे म्हणून तिला कलांडी येथील जंगलमय भागात घेवून गेला. तिथे तिच्यावर बलात्कार करुन तिचा लैंगिक अत्याचार केला. पीडीत मुलीने त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेत सरळ घर गाठले व सर्व हकिकत तिच्या आईला सांगितली. त्यानंतर तीच्या आईने गुहागर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुध्द तक्रार दिली. Accused in rape case life imprisonment


दरम्यान, पोलिसांनी सदर गुन्हयाचा सखोल तपास करून आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. या फौजदारी खटल्याची सुनावणी चिपळूण येथील अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांच्या समोर झाली. सरकारपक्षातर्फे आरोपीचा गुन्हा शाबीत करण्याकरीता सरकारी वकील श्री. शेट्ये यांनी एकूण १० साक्षीदार तपासून सबळ पुरावा न्यायालयासमोर आणला. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांची साक्ष महत्वाची ठरली. Accused in rape case life imprisonment
बचावपक्षातर्फे आरोपीने स्वतः कोर्टासमोर साक्ष दिली व त्यानंतर दोन्ही बाजुच्या वकीलांनी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे न्यायनिवडे देवून विस्तृत युक्तीवाद केला. अंतिम युक्तीवादानंतर चिपळूण येथील अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायाधीश डॉ. अनिता श्रीरंग नेवसे यांनी सरकारपक्षाचा सखोल युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी प्रकाश शंकर वाघे यास पीडीत बालीकेच्या बलात्कार प्रकरणी भा.द.वि. कलम ३७६ (अब) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम ५ सह ६ अन्वये दोषी ठरवून जन्मठेप व २५००० /- रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या शिक्षेमुळे पीडीत मुलीला न्याय मिळाल्याबाबत तिचे आईवडील नातेवाईक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. Accused in rape case life imprisonment
या प्रकरणी सरकारी वकील श्री. पुष्पराज शेट्ये यांनी सरकार पक्षातर्फे न्यायालयात भक्कम बाजू मांडली. या गुन्हयाचा संपूर्ण तपास स. पो. नी. वर्षा शिंदे यांनी केला. तसेच पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार श्री. प्रदिप भंडारी यांनी काम पाहिले. तसेच त्यांना पोलीस उपनिरीक्षक श्री. सुजित सोनावणे व पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांनी सहकार्य केले. Accused in rape case life imprisonment