• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 September 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खून करण्याच्या इराद्याने हल्ला करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर

by Mayuresh Patnakar
September 12, 2026
in Guhagar
47 1
0
Accused granted bail
93
SHARES
265
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

 ॲड. अलंकार विखारे यांच्या युक्तिवादाला यश

गुहागर, ता. 12 : शहरातील वरचापाट या ठिकाणी राहणारा संदीप तुकाराम गिजे याने तारीख 06/07/2026 रोजी दुपारी एक 1.30 मिनिटांच्या सुमारास किर्तनवाडी येथे राहणाऱ्या मंगेश काशिनाथ माटल याच्या राहत्या घरी जाऊन कौटुंबिक वादाच्या आणि संशयाच्या कारणावरून, त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर धारदार कोयत्याने वार केले. या हल्ल्याची तीव्रता एवढी मोठी होती की मंगेश माटल याच्या कानाच्या मागे, उजव्या खांद्यावर जीवघेण्या दुखापती झाल्या होत्या. या घटनेची खबर मिळताच गुहागर पोलिसांनी संदीप गिजे या संशयित आरोपीला तात्काळ अटक केली होती. खुनाचा प्रयत्न करणे या गुन्ह्याखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची रवानगी विशेष कारागृह रत्नागिरी येथे करण्यात आली होती. Accused granted bail

संशयित आरोपीला जामीन मिळण्यासाठी ॲड. अलंकार विखारे  यांनी त्याच्या वतीने चिपळूण जिल्हा सत्र न्यायालय येथे जामीन अर्ज दाखल केलेला होता. त्या जामीन अर्जावर गुहागर पोलिसांनी आणि सरकारी पक्षाने तीव्र हरकत नोंदवली होती. तथापि आरोपीच्या वतीने बाजू मांडताना ॲड. अलंकार विखारे यांनी पोलिसांचे तपास काम जवळपास पूर्ण झालेले आहे. जखमी व्यक्तीला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या जखमांचे स्वरूप जीव घेणे होते असे मानता येणार नाही, असा तार्किक युक्तिवाद केला. ॲड. अलंकार विखारे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून चिपळूण येथील जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी संशयित आरोपी संदीप गिजे याची रक्कम रुपये 50,000/- इतक्या रकमेच्या जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश पारित केले आहेत. Accused granted bail

Tags: Accused granted bailGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share37SendTweet23
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.